Monday, May 4, 2026

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार


नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेख बशीर शेख रशीद यांनी एका निवेदनाद्वारे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
प्रभाग क्र. 11 चे एम.आय.एम. पक्षाचे नगरसेवक मोहम्मद फसीयोद्दिन यांनी काही दिवसापूर्वी इतवारा पो.स्टे. मध्ये खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिन मिळण्याकरीता जिल्हा व सत्र लिपीक पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड येथे अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. दिनांक 21/04/2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधिश नांदेड यांनी माझा अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर केला व मला अटकपूर्व जामिन देण्यात आली आहे.
न्यायालयाने माझी बाजू ऐकून मला अटकपूर्व जामिन केल्यानंतर सुध्दा अनाधिकृतरित्या चालणारे न्यूज पोर्टल ज्याचे नांव वास्तव न्युज लाईव्ह असा आहे. ज्याला कोणतीही मान्यता नसून सुध्दा ते सतत लोकांचे फोटो छापून बातम्या प्रसारीत करुन त्यांची सर्वत्र बदनामी करुन नुकसान करीत आहेत.
रामप्रसाद खंडेलवाल हे अशाप्रकारच्या खोट्या बातम्या एम.आय.एम. पक्षाचे सदर सय्यद मोईन यांच्या दबावाखाली अशा खोट्या बातम्या प्रकाशि करीत आहे. वास्तव न्यूज लाईव्ह अनाधिकृत न्यूज पोर्टलचे स्वंयघोषीत संस्थापक व पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, रा. वजिराबाद नांदेड यांनी माझी फोटो टाकून त्यांच्या अनाधिकृत न्युज पोर्टल पेज वर बातमी टाकून माझी सर्वत्र बदनामी करुन माझी अब्रू नुकसान केली आहे. त्यामुळे अनाधिकृत न्युज पोर्टल पेजवर माझी फोटो प्रकाशित करुन बातमी टाकणाऱ्या वास्तव न्युज लाईव्हचे स्वयंघोषीत संपादक व पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या विरुध्द लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Monday, October 7, 2024

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले.
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ  समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने १५ हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केले. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष  महादेव नागरगोजे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने मेळाव्यास सुरुवात झाली. प्रास्ताविक महादेव नागरगोजे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पोलीस पाटील यांनी सत्कार केला. 
सत्काराला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस पाटील हे प्रशासनाचे नाक कान आणि डोळे आहेत. आपल्याला २४ बाय ७ काम करावे लागते. सरकारही असेच २४ बाय ७ काम करणारे आहे.  आपले हे प्रामाणिक काम असल्यानेच शासनाने आपले मानधन साडेसहा हजार रुपयांवरुन १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. सढळ हस्ते न्याय दिला आहे. 

मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी शासनाने राबविलेल्या योजनांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुटुंबातील प्रत्येक घटकाला शासन लाभ देत आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक सबलीकरण, शेतकरी अशा सर्व घटकांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या गावात या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या,असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारभारी पाटील यांनी आभार मानले.
०००००

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार

नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...