Sunday, December 10, 2023

हातनीकर व बोमनाळे परिवाराचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी केले सात्वंन


         मौजे हातनी ता. लोहा येथील प्रतिष्ठित नागरिक  मोतीराम बापूजी जाधव यांचे आल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.ते बाळु पाटील हातनीकर यांचे वडील आहेत. त्यांच्या कुटुंबांची आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भेटून सांत्वन केले यावेळी हातनीकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
               नायगांव बाजार शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा राजकीय कार्यकर्ते देवीदास पाटील बोमनाळे याची आई चंद्रकलाबाई नागोराव पा. बोमनाळे याचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले या परिवाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी भेटून सात्वंन केले.
           यावेळी भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, सुहास पाटील, पांडुरंग उबाळे, दिगंबर उबाळे, गोविंदराव उबाळे, मुर्ताजी कदम, सुभाष कदम, गणेश पा.ढेपे, गोविंदराव बेटकरसह  हातनीकर परिवारातील व बोमनाळे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Friday, December 8, 2023

नांदेड शहरातील अॅटोमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवुन जबरी चोरी करणारी टोळी पोलीस स्टेशन वजिराबादच्या डि.बी. पथकाकडुन जेरबंद

एक 63 वर्षीय वाशिम जिल्हयातील ज्येष्ठ नागरिक सुवर्ण कारागीर हे त्यांच्या 60 वर्षीय पत्नीसह नांदेड शहरामध्ये त्यांच्या खाजगी कामासाठी दि. 04/12/2023 रोजी सकाळी आले होते व आपले काम आटोपुन ते रात्री 10.00 वा. चे सुमारास नांदेडहुन वाशिमसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाण्यासाठी सिटी बस स्टैंड • मध्यवर्ती बस स्टैंड दरम्यान एक ॲटो क्रं. MH-26 N 5625 या ॲटोने जात असताना, त्या अॅटोमध्ये अगोदरच दोन प्रवाशी समोरील बाजुस दोन व मागील बाजुस एक असे प्रवाशी बसलेले असताना सदर 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या 60 वर्षीय पत्नी यांना बसवुन मध्यवर्ती बस स्टँडच्या दिशेने जात असताना मध्येच ॲटो थांबवुन अॅटोमधील चालक व त्याचेसोबत असणारे इतर 03 आरोपींनी 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या 60 वर्षीय पत्नी यांना खाली उतरवुन त्यांना शिवीगाळ करुन दम देवुन व जिवे मारण्याची धमकी देवून त्यांचे खिशातील 13,000/- रुपये व एटीएम कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड असे त्यांचे पैशाचे पॅकेट जबरीने काढुन घेवुन पळुन गेले होते अशा वर्णनाच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड येथे गु.र.न. 555/2023 क. 392,34 भादवि हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे व उप विभागीय पोलीस अधिकारी  सुरज गुरव यांनी सदर प्रकरणामध्ये आरोपी निष्पन्न करुन तात्काळ अटक करणेबाबत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना आदेश असता त्यांनी पोलीस स्टेशन वजिराबाद, नांदेडच्या डिबी पथकास योग्य मार्गदर्शन करुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना केल्या असता पोलीस स्टेशन वजिराबाद चे डिबी पथकातील पोलीस अमंलदार पोहेकॉ / 2083 दत्तराम जाधव, पोहेकॉ / 2085 विजयकुमार नंदे, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोकों/ 2616 अरुण साखरे, पोकों / 2896 शेख इमरान, पोकॉ / 3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/ 14 भाऊसाहेब राठोड यांनी पो.स्टे. हददीतील आपले गोपनीय बातमीदारांकडील उपलब्ध माहिती आधारे नांदेड शहरामध्ये शोध घेवुन बस स्टैंड परिसरामध्ये आरोपी नामे 1. शेख हाजी शेख खालेद, वय 32 वर्ष, व्य. मजुरी, रा. नई आबादी, नांदेड 2. मंगेश नारायण सोनकांबळे, वय 30 वर्ष, व्य. मजुरी, रा. आंबेडकर नगर, नांदेड. 3. शेख बाबु शेख फरीद, वय 43 वर्ष, व्य. मजुरी, रा. नई आबादी, नांदेड. 4. शेख वसीम ऊर्फ लंगडा शेख सत्तार, वय 27 वर्ष, व्य. मजुरी, रा. नई आबादी, नांदेड असे आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झ ल्यावरुन त्यांचा शोध घेवुन गुन्हयामध्ये वापरलेला अॅटो क्रं. MH-26 N-5625 हा ताब्यात घेवुन सर्व आरोपींना ताब्यात घेतले व सदर गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री. प्रविण आगलावे यांचे ताब्यात दिले व आज रोजी सदर आरोपींना मा. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय नांदेड यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींची 05 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मा. न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणुन श्रीमती एस. बी. जोहिरे मॅडम यांनी कामकाज पाहिले.

सदर प्रकरणामध्ये कामकाज करणारे पोलीस स्टेशन वजिराबाद येथील सर्व पोलीस अधिकारी, अमलदार व सरकारी वकील यांचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Tuesday, December 5, 2023

मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न खा. चिखलीकर यांनी संसदेत सादर केला

नांदेड : महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज संसदेत प्रश्न सादर केला.  नियम 377 अधिन राहून त्यांनी मराठीतून हा प्रश्न उपस्थित करण्याची अनुमती मागितली होती मात्र प्रश्न उपस्थित करण्याऐवजी तो सादर करण्याची त्यांना अनुमती मिळाली आणि अखेर त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान पर्यंत पोहोचवला आहे.

महाराष्ट्रात मराठा समाजाची आरक्षणाची मागणी अत्यंत तिव्र होत आहे. या मागणी साठी मराठा समाजाकडून 58 महामोर्चे प्रत्येक जिल्हयात काढण्यात आले या सर्व मोर्चा मध्ये लाखोंच्या संख्येनी मराठा समाज सहभागी झाला त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र शासनाने त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले या संदर्भात मा.उच्च न्यायालयात सदर आरक्षण टिकले पंरतु सर्वोच्च न्यायालयात सदर आरक्षण टिकले नाही यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजात नैराश्य निर्माण झाले यातुन अनेकांनी आत्महत्या केल्या. 
         याच दरम्यान 14 ऑक्टोंबर पासुन महाराष्ट्रात विविध ठिकाणी आमरण उपोषणे सुरु झाली अतिशय छोटया गावातुन उपोषणे होत आहेत. जालना जिल्हयातील आंतरवाली सराटी या ठिकाणच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक उग्र रुपही निर्माण झाले त्यातून लोकप्रतिनिधीला गावाबंदी करण्यात आली काही ठिकाणी त्यांच्या घरावर दगडफेक झाली घरे पेटवण्यात आली.
मराठा समाजाच्या भावना तीव्र होत आहेत. या समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. मराठा समाज हा अतिशय आर्थिक विवंचणेत हालाखीचे जिवन जगत आहे. अनेक विद्यार्थी हिरमुसले होत असुन आत्महत्या करत आहेत. हा समाज शेती प्रधान व्यावसायीक आहे त्यामुळे मराठा, कुणबी मराठा हे एकच आहेत मराठा समाजाला कुणबी मराठा गृहीत धरुन ओ.बी.सी.प्रवर्गातून या समाजाला आरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे या सोबतच धनगर समाजाचा ही आरक्षणाचा प्रश्न आहे. या साठी केंद्र शासनाने यात लक्ष घालून मराठा समाजाला व धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी विनंती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज संसदेत केले आहे.

प्राणिताताई देवरे -चिखलीकर याना नांदेड लोकसभा संयोजक पदाची जबाबदारी

नांदेड ;तेलंगणा राज्यातील संगारेड्डी विधानसभा मतदारसंघात जेथे भाजपा उमेदवारांसाठी मतदारांना पक्षाची ध्येयधोरणे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न असो की पक्षाने वेळोवेळी दिलेल्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असलेल्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी नांदेड लोकसभा महिला मोर्चा संयोजक पदी पक्षाने नियुक्ती केली आहे.त्याच्या या नव्या जबाबदारी मुळे पक्षाला    महाविजय २०२४ अभियाना साठी  फायदा होणार आहे
  
तीन राज्यात विजय संपादन केल्या नंतर भारतीय जनता पार्टीने राज्यात लोकसभा २०२४ महाविजय अभियान सुरू केले आहे.  प्राणिताताई या पक्ष संघटनेत अतिशय जबाबदारीने काम करतात.तेलंगणा राजातील निवडणुकीत त्यांनी केलेले कार्याची  पक्षातील वरिष्ठांनी दखल घेतली आहे..नांदेड लोकसभा मतदार संघात त्याचा दांडगा संपर्क आहे.प्रभावी वक्तृत्व ,सहजपणे महिला , नागरिकांत मिसळणे, लोकांच्या समस्या तातडीने सोडविणे  त्यामुळे त्याचे नेतृत्व आता लोकप्रिय होताहे.मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदारसंघातील जवळपास एक हजार गावांत जाऊन प्रचार केला होता त्यानंतरही पाच वर्षात या भागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या तत्पर असतात.त्यामुळेच प्राणिताताई यांचे नेतृत्व लोकमान्य झाले आहे
    लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी ची तयारी व त्यात विजय मिळवण्यासाठीमहाविजय२०२४ अभियान भारतीय जनता पार्टी महिलामोर्चा महाराष्ट्रप्रदेश कडून प्राणिताताई देवरे चिखलीकर यांची नांदेड   लोकसभा महिला मोर्चा संयोजिका म्हणून महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नियुक्ती केली   आहे पक्षाला अभिप्रेत असणारे लोकसभेचे काम आपण कराल हा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे .नांदेड लोकसभा  संयोजक पदी  महिला मोर्चाच्या  प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई यांची निवड झाल्याबद्दल त्याचे पक्षाच्या वतीने अभिनंदन होत आहे

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...