Wednesday, July 26, 2023

नांदेड- बंगळुरू- गोवा विमानसेवेची घोषणा**अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश**मुंबई, हैद्राबादच्या सेवेसाठीही प्रयत्नशील राहण्याची ग्वाही*


नांदेड दि. २६ जुलै २०२३: 

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, नांदेड- बंगळुरू- गोवा मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याचे जाहीर झाले आहे. 

या निर्णयाचे चव्हाण यांनी स्वागत केले आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, 'फ्लाय ९१' नामक नवीन विमान कंपनीने 'उडाण' योजनेंतर्गत नांदेड- बंगळुरू- गोवा ही विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय जळगाव- पुणे- गोवा- हैद्राबाद, सिंधुदूर्ग- पुणे- बंगळुरू- हैद्राबाद, अगात्ती (लक्षद्विप)- बंगळुरू- गोवा या विमानसेवा देखील सदर कंपनीने घोषित केल्या आहेत. दीर्घ काळापासून हवाईसेवेच्या नकाशातून लुप्त असलेले नांदेड शहर या निर्णयामुळे पुन्हा या नकाशात समाविष्ट झाले आहे. मात्र, सदरहू विमान कंपनी नवीन असल्याने तसेच यापूर्वीचे कटू अनुभव लक्षात घेता नांदेडची विमानसेवा सुरळीत व नियमित रहावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

नांदेड शहराची ठप्प पडलेली विमानसेवा 'उडाण' योजनेंतर्गत पुन्हा सुरू करण्यासाठी मी १४ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विस्तृत निवेदन दिले होते. त्यानंतरही मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. एवढेच नव्हे तर काही प्रवासी विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना मी वैयक्तिकरित्या भेटून नांदेड व लगतच्या जिल्ह्यांमध्ये असणारी हवाई प्रवासी वाहतुकीची व्यावसायिक संधी निदर्शनास आणून दिली होती. अखेर आता पहिली विमान सेवा जाहीर झाली असून, पुढील काळात नांदेड-मुंबई व नांदेड-हैद्राबादसह इतरही विमान सेवा सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत राहू, असेही अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे गेल्या २१ जुलै रोजीच त्यांनी महाराष्ट्रातील विमानतळांची दूरवस्था आणि अपुऱ्या विमानसेवेबाबत लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी विधानसभेत बोलताना त्यांनी नांदेडहून 'उडाण' योजनेंतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी स्वारस्य दाखवल्याचे सूतोवाच केले होते. मात्र, नांदेड विमानतळाची जबाबदारी असलेली रिलायन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने या विमानतळावरील सुविधा बाधित झाल्या आहेत. नाईट लँडिंग बंद झाले आहे. रिलायन्सने 'डीजीसीए'ला देय असलेले शुल्क देखील भरलेले नाही, याकडे त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. एकट्या अहमदाबादसाठी मुंबईहून रोज १८ विमाने उड्डाण करतात. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात केवळ १५ विमानसेवा उपलब्ध असल्याचे सांगून अशोकराव चव्हाण यांनी राज्यातील विमानसेवांकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचे विमानतळ पुन्हा सुरू करण्यासाठी रिलायन्सकडून वसूल करण्याच्या अटीवर 'डीजीसीए'ची देणी राज्य सरकार आपल्या तिजोरीतून भरेल, अशी घोषणा केली आहे.

नांदेड - गोवा, नांदेड - बेंगलोर विमानसेवा लवकर सुरू होणार: खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा केंद्रीय उड्डाण मंत्री सिंधिया यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा


नांदेड : नांदेड शहराला पुन्हा एकदा देशातील मेट्रोसिटीशी जोडण्यासाठी, व्यापार उद्योग, भाविक भक्तांच्या सेवेसाठी , नागरिकांचा प्रवास जलद गतीने आणि सुकर होण्याचे अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे नांदेड - गोवा आणि नांदेड - बेंगलोर या विमान सेवेला हिरवा कंदील मिळाला असून लवकरच ही विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उडेगा देश का आम आदमी उड्डाण ही योजना सुरू केली. देशातील अन्य राज्य आणि शहरांसह नांदेड येथेही विमान सेवा सुरू करण्यात आली होती. नांदेड -, नांदेड- हैदराबाद ,नांदेड -, नांदेड- दिल्ली या मार्गावर सुरू झालेल्या विमानसेवेचा नांदेडकरांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. शिवाय शीख समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुजुर साहिब गुरुद्वारासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठीही या विमानसेवेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती . दरम्यानच्या काळात काही तांत्रिक अडचणीमुळे हळूहळू या विमानसेवा बंद पडल्या . रिलायन्स कंपनीकडे विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. सदरील कंपनीने ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नसल्याने येथून रात्रीला उड्डाण करण्यासाठी असलेली यंत्रणा बंद पडली. त्यामुळे नांदेड विमानतळावर रात्रीचे वेळी उतरणाऱ्या आणि उडान करणाऱ्या विमान व्यवस्थेलाच बाधा पोहोचली .या बाबीचा प्रवाशांना,भाविक भक्तांना, रुग्णांना आणि प्रवाशांनाही मोठा फटका बसला होता . ही बाब लक्षात घेता नांदेड येथून पुन्हा विमानसेवा सुरू व्हावी यासाठी येथील व्यापारी, प्रवासी आणि शीख समाजातील भाविक भक्तांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे मागणी केली होती . या मागणीच्या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन नांदेड येथून पूर्वत विमानसेवा सुरू करावी यासाठी पाठपुरावा केला . अखेर या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नांदेड येथून नांदेड - गोवा आणि नांदेड - बेंगलोर या मार्गावरील विमान सेवेला हिरवा कंदील दाखवला आहे. एवढेच नाही तर नांदेड विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडून काढून घेऊन ते एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे . विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचा विमान प्रवास अधिक सुकर आणि जलद गतीने व्हावा या अनुषंगाने खा. चिखलीकर यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला यश आले आहे . नांदेड - गोवा आणि नांदेड- बेंगलोर विमानतळ विमानसेवा सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच नांदेड येथून मुंबई , हैदराबाद , दिल्ली आणि अमृतसर या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्यासाठी आपला सकारात्मक प्रयत्न आहे . केंद्रीय उड्डाण मंत्री सिंधिया यांनीही या अनुषंगाने आपली सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे . त्यामुळे आगामी काळात नांदेड येथून देशभरातील मेट्रो शहरांना जोडण्यासाठी विमानसेवा सुरू होईल . त्याचा फायदा नांदेडच्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी आणि नांदेड येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी निश्चितपणे होईल असा विश्वास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त २ ऑगस्ट रोजी ह भ प इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा.



नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मालेगाव रोड वरील भक्ती लॉन्स येथे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरिकर यांच्या कीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जनतेच्या कल्याणासाठी, हितासाठी सदैव तत्पर सनारे आणि आपल्या कामातून नांदेड लोकसभा मतदारसंघाचा नावलौकिक दिल्लीपर्यंत पोहोचवणारे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस याही वर्षी विविध कार्यक्रमानी आणि उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता भक्ती लॉन्स येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे . यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातील अनेक भारतीय जनता पार्टीचे अनेक लोकप्रतिनिधी, पुढारी ,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. वाढदिवसानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे . नांदेड लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात आणि विधानसभा मतदारसंघातही असंख्य कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. रक्तदान शिबिर, फळवाटप ,वृक्षारोपण, सत्संग , सेवासप्ताह असे असंख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले असताना जनतेला भक्ती मार्गाची शिदोरी मिळावी, त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तन सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे , माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले , भाजपा जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर , भाजपा प्रदेश सरचिटणीस सौ. प्रणिताताई देवरे - चिखलीकर , भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

Wednesday, July 19, 2023

पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीस शासनाची हिरवी झेंडी खा.चिखलीकरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नांदेड/प्रतिनिधी -नांदेड शहराचा झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार हाच पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचे उगमस्थान ठरले आहे. नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पावडेच्या लोकप्रतिनिधीचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी भेटले.त्यांनी नगरपंचायतच्या निर्मितीस हिरवी झेंडी दाखवली.                          
नांदेड शहराचा झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार हाच पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचे उगमस्थान ठरले आहे.                       सोमवार दि. 18 जुलै 2023 रोजी नांदेडचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पावडेवाडी ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी नांदेड उत्तर विधानसभा निवडणुक प्रमुख मिलिंद देशमुख, संभाजीराव फावडे उर्फ तात्या,बंडू पावडे (मोठा), प्रतापराव पावडे, बापुराव उर्फ बंडू पावडे (छोटा), हरीभाऊ पावडे, जिल्हा भाजपा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे  आदि पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या विधान भवनातील दालनात भेट घेतली.पावडेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीवाढ झाली आहे. ग्रामपंचायतचे कार्यक्षेत्र नांदेड शहराचे मध्यवर्ती ठिकाण व्यापले आहे. नागरीकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतची यंत्रणा तोकडी पडत आहे, त्यामुळे नागरिकांना रस्ते,पाणी, मलनिःसारण, लाईट यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पावडेवाडी ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावडेवाडी शिष्टमंडळाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करुन नगरपंचायतच्या निर्मितीस हिरवी झेंडी दाखवली. खा.चिखलीकराना तुम्ही मुंबईत थांबा तुम्हाला सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घडवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
 मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीस तत्वतः मान्यता दिल्यामुळे पावडेवाडीच्या निर्मितीस प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.        तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यावेळी पालकमंत्री असलेल्या अशोकराव चव्हाण यांनी नांदेड वाघाळा महानगर पालिकेत पावडेवाडी ग्रामपंचायतचे विलीनीकरण करण्याचा राजकीय डाव रचला होता, महापालिकेत विलीन होण्यास पावडेवाडीच्या जनतेने प्रखर विरोध दर्शवून आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे महापालिका हद्द वाढीचा प्रस्ताव बारगळला आहे. राज्यातील शिवसेना -भाजपा-राष्ट्रवादी अजित दादा पवार यांच्या ट्रीपल इंजीनच्या गतीमान सरकारपुढे पावडेवाडी नगरपंचायतच्या निर्मितीचा प्रस्ताव खा.चिखलीकर यांनी सादर करताच त्यास मुख्यमंत्री -उपमुख्यमत्र्यांनी तत्वतः मान्यता दिल्यामुळे नगरपंचायतच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याचा दावा खा.चिखलीकर यांनी केला आहे हे विशेष!

उपोषण सोडण्यासाठी प्रणिता देवरे चिखलीकर यांनी केली हडसणीकरांची मनधरणी


 नांदेड (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसापासून उपोषण आंदोलन करणाऱ्या, दत्ता पाटील हडसणीकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करत शासनाने आंदोलनाची दखल घेतली आसून उपोषण मागे घ्यावे असा आग्रह करत भाजपा प्रदेश 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १५ दिवसापासून हदगाव तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर यांनी उपोषण आंदोलन सुरु केले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. दरम्यान भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी शासकीय रुग्णालय येथे जाऊन दत्ता पाटील हडसणीकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शासनाने आपल्या आंदोलनाची दखल घेतली आसून आंदोलन मागे घेण्याचा आग्रह प्रणिता देवरे चिखलीकर यांनी यावेळी केला. यावेळी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी अरुना संगेवार विकास माने, तहसीलदार संजय वारकंड, डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. एस आर डाकोरे,  . आर. एम ओ आमोल गायकवाड, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पवार,भाजपा तालुकाध्यक्ष सुनील मोरे दिपक कानवटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे   मंगेश कदम अनिल मोरे पपु पावडे सुधिर हंबर्डे  राजेश पावडे राजेश हंबर्डे समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार

नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...