Saturday, September 24, 2022

रेडियोचे स्थानिक प्रसारण पुर्ववत करण्यासाठी खा. चिखलीकरांना साकडे; स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन

नांदेड,24-  नांदेड आकाशवाणीसह महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांचे पूर्वीप्रमाणे तिन्ही वेळेत स्थानिक प्रसारण सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आकाशवाणी प्रासंगिक उद्घोषक व संकलक संघटनेने दिले आहे.      
     दिनांक 1 जुलै 2022 पासून महाराष्ट्रासह गोवा आणि मध्यप्रदेशच्या एलआरएस केंद्रावरून आकाशवाणीचे  दुपारचे व संध्याकाळचे असे दोन वेळचे प्रसारण बंद केले गेले आहे.  स्थानिक कार्यक्रम बंद करून या वेळेत मुंबई व ईतर आकाशवाणीचे कार्यक्रम सहक्षेपित  केले जात आहेत. त्यामुळे स्थानिक कलावंत, कवी वक्ते, कथाकार व नाटककार सादरीकरणाला मुकले आहेत तसेच प्रासंगिक उद्घोषक व संकलन यांच्या ड्यूट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून असलेले निवेदक बेरोजगार झाले आहेत. प्रसारण बंद झाल्यामुळे श्रोते व कलावंत नाराज झाले आहेत. स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शेख हसीना, सचिव अंकुश सोनसळे, आनंदा गोडबोले, नम्रता वावळे, बालाजी गवारे व सल्लागार मिलिंद व्यवहारे यांची  उपस्थिती होती. 
चौकट 
स्थानिक आकाशवाणी केंद्राचे  प्रसारण पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली आकाशवाणी केंद्राशी पत्र व्यवहार करून पुन्हा हे प्रसारण सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. त्यांनी या निवेदनाची दखल घेऊन या संदर्भात दिल्ली कार्यालयास मेल देखील पाठवून पुन्हा स्थानिक प्रसारण सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नांदेडचा रेडियो बंद पडू देणार नाही, असे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

UAPA कायद्याने PFI सारख्या संघटनेवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्राला, केंद्र सरकार बंदी का घालत नाही? नाना पटोले

मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२२
दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात दहशतवादी कारवायांना कसलेही स्थान मिळता कामा नये, राज्यात शांतता राहिली पाहिजे हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडायला नको आहेत. अशा प्रवृत्तींना राज्यातून ताकद मिळते काय ? हे तपासले पाहिजे. हिंदू- मुस्लीम वाद निर्माण करून कोणी आपली राजकीय पोळी भाजत आहे का ? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्या लोकांवर कडक कारवाई करा. परंतु UAPA कायद्यानुसार PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती पण केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? केंद्रात आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे, या सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का? असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते पण ईडी सरकारच्या काळात राज्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदारच गोळीबार करतो, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय ?

काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सुरु झाल्यापासून देशातले वातावरण बदलले आहे. राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेची भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही दखल घ्यावी लागली म्हणून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीत जाऊन इमाम इलिसायी यांची भेट घेतली, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. कालपर्यंत राहुलजी गांधी यांच्यावर टीका करणारे बाबा रामदेव यांनीही भारत जोडो यात्रेची दखल घेत राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचे स्वागत केले. हा बदल भारत जोडो पदयात्रेमुळे होत आहे. राहुलजी गांधी हाती तिरंगा घेऊन देश जोडायचे काम करत आहेत,  सर्व धर्माला एकत्र घेऊनच देश जोडला जाऊ शकतो ही राहुलजी गांधी यांची भूमिका जर कोणाला पटत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. राहुलजी गांधी यांची भूमिका देशहिताची आहे आणि देशापेक्षा कोणी मोठा नाही.

महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबरला येत आहे. यावेळी ज्या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे त्या भागातील काँग्रेस कार्यकर्ते व लोक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतील व राहुलजी गांधी यांच्या देश जोडण्याच्या या महान कार्यात सहभागी होतील अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Friday, September 23, 2022

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम,आरोग्य शिबीरात शेकडो रुग्णांची तपासणी-माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, प्र,जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा विधी प्राधिकरणाचे न्यायमूर्ती दलजीत कौर जज सह विविध मान्यवरांच्या भेटी

नांदेड दि.
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी व लायन्स क्लब मिडटाऊनच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या  आरोग्य शिबिरास गुरूवार दि. २२ सप्टेबर रोजी प्रारंभ झाला असून या आरोग्य शिबिरास राज्याचे माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा विधी प्राधिकरणाचे न्यायमूर्ती दलजीत कौर जज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, दै. सत्याप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, नवल पोकर्णा सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आहे.
आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून रूग्ण आले आहेत. रूग्ण व त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, प्र. उपाध्यक्ष कमल कोठारी, बनारसीदास अग्रवाल, डॉ. लक्ष्मीकांत बजाज सह लायन्स क्लब मिडटाऊनचे पदाधिकारी  शिबीर स्थळी तळ ठोकून आहेत. 
आरोग्य शिबीरातील रूग्णांवर प्रसिध्द बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. प्रज्ञा गाडगीळ, डॉ.ऋता देव, डॉ. श्रेया गांधी, डॉ. चिन्मय चौधरी, डॉ. ऐरावती, डॉ. प्रज्ञा, डॉ. सोनम, फिजिओ थेरपिस्ट आशा चिटणीस, उर्मी शहा, डॉ. जल्पा बेंगाली सह तीस तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत.
आरोग्य शिबिरास राज्याचे माजी मंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा विधी प्राधिकरणाचे न्यायमूर्ती दलजीत कौर जज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, दै. प्रजावाणी चे संपादक गोवर्धन बियाणी, दै. सत्याप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, डॉ. सरिता सोनाळे, डॉ. प्रदीप गायकवाड, नवल पोकर्णा सह विविध क्षेत्रातील अन्य मान्यवरांनीही भेटी देऊन माहिती घेतली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबतचा हेतू, आतापर्यंत किती रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले, या शिबिराचा किती रुग्णांना लाभ झाला याबाबतची माहिती दिली. आरोग्य शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनातून करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याची मान्यवरांनी प्रसंशा केली आहे.
आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  मूख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नियोजनात आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. तसेच सिडकोच्या भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी शिबिरात स्वयंसेवकाची भूमिका निभावत आहेत. या आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ होत आहे. हे आरोग्य शिबीर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य तर त्यांच्या पालकात समाधान व्यक्त करणारे ठरले आहे.

Wednesday, September 21, 2022

राज्यात येणारे वेदांत फॉक्सान उद्योग गुजरातला हलविल्यामुळे शहर राष्ट्रवादी युवकचे आंदोलन

नांदेड/प्रतिनिधी
राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न परंतु सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यात येणारे वेदांत फॉक्सान हा उद्योग केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन गुजरातकडे वळविण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसच्यावतीने आयटीआय चौक येथे निषेध आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू होत्या. वेदांत फॉक्सान उद्योग राज्यात येणार होता. परंतु घातपात करून केंद्रीय सत्तेचा वापर करत राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार केंद्रीय सत्तेपुढे लोटांगण घालत सदरील उद्योग गुजरातला पाठवित आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय चौक याठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात निरीक्षक निशांत वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, युवक शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, दक्षिण अध्यक्ष माधव चिंचाळे, उत्तर अध्यक्ष निखील नाईक, जिल्हा शहर सचिव मोहम्मद सरफराज अहेमद, संघटक अ. सत्तार, आतिक बिल्डर, शफी उर रहेमान, युनूस खान, गुलाम मोबीन, मोहम्मद मुस्ताक, अ‍ॅड. खादरी, विक्रम ठाकूर, नितीन झुंझारे, सिंधुताई देशमुख, प्रसेजनीतकौर कोल्हापुरे, हसीना बेगम, मोहम्मद मोबीन, लखन वाघमारे, विजय रणखांबे, अनिल मल्हारे, साहेबराव गोमसकर, जफार पठाण, अ. रज्जाक, अविनाश वाघमारे, गणेश जोंधळे, सय्यद मोहम्मद, विजय घोगरे, प्रमोद कांबळे, ओंकार वाघमारे, आकाश वाघमारे, विक्कीसिंघ गील, शंतनु पाटील, अब्दुल गफार, फिरदोस खान, सय्यद कलीम, महेंद्र भटलाडे, शेख खदीर, गोविंद यादव, जिलानी भाई, प्रमोद नरवाडे, पंकज कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पत्रकार शेख याहिया यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार




नांदेड-

साप्ताहिक पुकारचे संपादक तथा माझा महाराष्ट्र लाईव्हचे संचालक शेख याहिया यांना शक्ती
फिल्म प्रोडक्शनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


दि. 30 सप्टेंबर रोजी जयपुर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पत्रकार शेख याहिया यांना यापुर्वी अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. यात सत्यशोधक विचार मंचच्या वतीने समाजभुषण, खादमीन ए उम्मतचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तसेच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. तर आता जयपुर येथे शक्ती फिल्म प्रोडक्शनच्या अंबालिका शास्त्री यांच्या वतीने दि. 30 सप्टेंबर रोजी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार शेख याहिया यांना पुरस्कार जाहीर झाल्याबंद्दल पोलीस उपनिरीक्षक असद शेख,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिसाडे,
इम्रान खान सामाजिक कार्यकर्ता, इम्रान भाई मोबाईल मेकानिक यांनी शुभेच्छा दिली व
सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

कच्छवा लगाव मच्छर भगाव :एलसीबीला चिटकून बसलेल्या रक्तपिपासू डासांच्या निर्मूलनासाठी कधी होणार कारवाई ?


नांदेड :
  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एलसीबी विभागाकडे सर्वसामान्य नागरिकांचे नेहमीच लक्ष असते. परंतु गेल्या काही वर्षापासून एलसीबी म्हणजे आयो चोरों बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा अशी गत झाली आहे .एवढेच नाही तर या एलसीबीला काही रक्तपिपासू मच्छर असे घट्ट चिकटले की स्वतः श्रीमंत होण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. एवढेच नाही तर कायद्याच्य पिंजऱ्यातल्या अधिकारयाला सिंह म्हणून संबोधन्याची लाजिरवाणी बाबही अशा मच्छरांकडून होत आहे. त्यामुळे आता या मच्छरांच्या संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी कच्छवा अगरबत्ती ची गरज असून लवकरच या विभागात कछवा लगाव मच्छर भगाव अशी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त होते आहे.
गेल्या काही वर्षापासून नांदेड जिल्ह्यात भुरट्या भामट्या आणि स्वंघोषित पत्रकारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे अधिकाऱ्यांना धमकावणे दरडावने त्यांची गुप्त माहिती मिळवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे, गाड्या घोड्या घेणे. स्वतःवर असलेले कर्ज फेडण्यासाठी अधिकाऱ्याला सांगणे. आर्थिक माया गोळा करणे. असे खंडणी बहाद्दर पत्रकारिता करणाऱ्यांचा सध्या पोलीस दलातही मोठा शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा आहे. काहीजण तर स्वतःला अक्षरशः बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज समजू लागले आहेत. ज्यांचा आणि व्याकरणाचा कवडी मात्र संबंध नाही ,अलंकारिक भाषा तर सोडाच पण जे नांदेड शहरातील महत्त्वाच्या गल्लीत चाकू घेऊन फिरत होते ते लोक आता आपल्या लेखणीच्या टोकाला बरची, भाला समजून अधिकाऱ्यांना धमकावू लागले आहेत. काही वेळा अधिकार्याना इतके पाणी मारले जाते कि, त्या अधिकार्यांचे गुप्तांग गळून पडेल अशी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळे नको ती किरकिर म्हणून आपण कमावलेल्या वरकमाईतील काही पैशाचा तुकडा त्यांच्यासमोर टाकून संबंधिताला गप्प करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यामुळे नांदेड पोलीस दलात गेल्या काही वर्षापासून स्वतःला डॉन समजणाऱ्या या पत्रकाराचा पडदा फार्स करण्याची खरी गरज होती परंतु नांदेड जिल्ह्यातील भल्या भल्या गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस दलाला या डासाने चावा घेतल्यामुळे या विभागालाही पैसे देण्याचा मलेरिया झाल्याची चर्चा आहे . त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या विभागातील अधिकाऱ्यांची बारकाईने माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो . पोलीस विभागातील काही छुपे खबरी यांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांची अत्यंत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांसमोर गाडी घोडी , कर्ज फेडण्याचा प्रस्ताव ठेवला जातो. हा प्रस्ताव अधिकाऱ्याने स्वीकारला तर ठीक अन्यथा अत्यंत खालच्या पातळीवर येऊन बातमी दिली जाते. ही बातमी लिहीत असताना संबंधित विभागाच्या इज्जतीची लक्तरे वेशिवर टांगली जातात . सर्राईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवाळून त्यांना सरळ करणाऱ्या पोलीस विभागांला सोळो कि पळो करून सोडणार्‍या या हैवान पत्रकाराचा बंदोबस्त करण्याची हिम्मत मात्र नांदेड पोलीस दलात नाही काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. एक ना अनेक गुन्हे दाखल असलेला हा पत्रकार पोलिसांमध्ये मात्र उजळ माथ्याने फिरत आहे. काही प्रकरणात त्याला जामीन झाला नसतानाही काही अधिकारी त्याला पाठीशी घालतात ही मात्र तेवढीच केविलवाणी बाब आहे . सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्ये रात्री जाऊन त्याला उचलण्याचे धाडस दाखवणारे नांदेड पोलीस संबंधित गुन्हे बहाद्दर पत्रकार सोबत चहापाणी आणि फुकण्या फुकतात ही किळसवाणी बाब आहे .त्यामुळे संबंधित पत्रकाराची गेल्या अनेक वर्षापासून या विभागात सारखी दिवाळी सुरू आहे . जर या विभागात कछवा अगरबत्ती लागली तर हा मच्छर बोंबलत बाहेर जाईल आणि त्याच्या आयुष्यात शिमगा सुरू होईल अशा चर्चा सुरू आहे. पोलीस दलामध्ये सिंहासन, राजवाडा किंवा अन्य कोणतेही श्रृंगारिक अशी आसनं नसतात . पोलीस अधिकारी कर्मचारी हा सर्वसामान्यांच्या हितासाठी अंगावर खाकी वर्दी घातलेला असतो. तो त्याचे कर्तव्य बजावत असतो. त्या कर्तव्य बजावण्याच्या मोबदल्यात त्याला सर्वसामान्यांच्या घामातून गाळलेल्या आणि जमा केलेल्या महसुलातून दर महिन्याला पगार दिला जातो . त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी एखादे दमदार काम केले असेल तर निश्चितपणे त्याचे कौतुकच परंतु सिंहासन, सिंह, वाघ असे काही नसते. परंतु बकरा, शेळी, मांजर करण्यासाठी अशा स्वयंघोषित पत्रकारांचा वापर करून एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचा काटा काढला जातो एवढे मात्र खरे . यापूर्वी एलसीबी मध्ये येण्यासाठी दोन अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद निर्माण करण्यासाठीही या पुळचट महाभाग पत्रकाराने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती ही चर्चा नवीन आहे. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्याला काम करू देणे उचितच परंतु एखाद्या अधिकाऱ्याची अवास्तव अतियोशक्ति करणारी स्तुतीसुमनाने उधळुन पत्रकारितेची लाज घालऊ नये याची जाणीव किमान त्या पत्रकारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे . असे असले तरी लवकरच नांदेड एलसीबीत कछवा अगरबत्ती लावली जाणार असून रक्त पिपासू मच्छरांचा समूळ नायनाट केला जाणार असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे तूर्तास या मच्छराची दिवाळी येथे होईल त्यानंतर शिमगा सुरु होईल असे बोलले जाते.

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...