नांदेड- न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेख बशीर शेख रशीद यांनी एका निवेदनाद्वारे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
प्रभाग क्र. 11 चे एम.आय.एम. पक्षाचे नगरसेवक मोहम्मद फसीयोद्दिन यांनी काही दिवसापूर्वी इतवारा पो.स्टे. मध्ये खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिन मिळण्याकरीता जिल्हा व सत्र लिपीक पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड येथे अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. दिनांक 21/04/2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधिश नांदेड यांनी माझा अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर केला व मला अटकपूर्व जामिन देण्यात आली आहे.
न्यायालयाने माझी बाजू ऐकून मला अटकपूर्व जामिन केल्यानंतर सुध्दा अनाधिकृतरित्या चालणारे न्यूज पोर्टल ज्याचे नांव वास्तव न्युज लाईव्ह असा आहे. ज्याला कोणतीही मान्यता नसून सुध्दा ते सतत लोकांचे फोटो छापून बातम्या प्रसारीत करुन त्यांची सर्वत्र बदनामी करुन नुकसान करीत आहेत.
रामप्रसाद खंडेलवाल हे अशाप्रकारच्या खोट्या बातम्या एम.आय.एम. पक्षाचे सदर सय्यद मोईन यांच्या दबावाखाली अशा खोट्या बातम्या प्रकाशि करीत आहे. वास्तव न्यूज लाईव्ह अनाधिकृत न्यूज पोर्टलचे स्वंयघोषीत संस्थापक व पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, रा. वजिराबाद नांदेड यांनी माझी फोटो टाकून त्यांच्या अनाधिकृत न्युज पोर्टल पेज वर बातमी टाकून माझी सर्वत्र बदनामी करुन माझी अब्रू नुकसान केली आहे. त्यामुळे अनाधिकृत न्युज पोर्टल पेजवर माझी फोटो प्रकाशित करुन बातमी टाकणाऱ्या वास्तव न्युज लाईव्हचे स्वयंघोषीत संपादक व पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या विरुध्द लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.