Friday, January 27, 2023

शेख याहिया यांना राष्ट्रीय रतन पुरस्कार प्रदान

नांदेड- माझा महाराष्ट्र लाईव्हचे संचालक तथा संपादक व सामजिक कार्यकर्ते शेख याहिया  यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीयरत्न सन्मान 2023 हा पुरस्कार दि. 26 जानेवारी रोजी मेयर हॉल बीएमडब्ल्यू शोरूम लाईन अंधेरी वेस्ट मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृष्णा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त
बाजीराव महाजन, संगीतकार
इस्माईल दरबार , भाजप नगरसेविका
सुनिता राजेश मेहता, गायिका
रितू पाठक ,
डॉ. कृष्णा चव्हाण, पत्रकार
नसीर तगले
यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 नांदेड जिल्ह्यात गेल्या 13 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य शेख़ याहिया यांचे असून निस्वार्थपणे ते पत्रकारिता करीत आहेत. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे.
सामाजिक क्षेत्रात गेल्या 13 वर्षांपासून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देत आहेत. या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना सत्यशोधक मंचचा उत्कृष्ट पत्रकार, राज्यस्तरीय आदर्श पत्रकार, खादीमे उम्मतचा उत्कृष्ट पत्रकार, शक्ती फिल्मचा आंतरराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार तसेच महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तर आता कृष्णा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट राष्ट्रीय रतन सन्मानाने गौरविण्यात आल्याने 
याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Thursday, January 12, 2023

बेताल वक्तव्यातून वारंवार होणारा महापुरुषांचा अवमान थांबणे आवश्‍यक - माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण


नांदेड दि 12 राज्यात गेल्या काही दिवसांपासून   बेताल वक्तव्यातून वारंवार होणारा महापुरुषांचा अवमान थांबणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. 
शहरातील नवामोंढा येथील काँग्रेस कार्यालयात गुरुवार दि. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सचिव ॲड. सुरेंद्र घोडजकर, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मीलनताई खतगावकर, माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले, जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, माजी डीपीडीसी सदस्य अनिल मोरे, प्रवक्ते संतोष पांडागळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, नारायण श्रीमनवार आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ आशिर्वादच दिला नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद यांचे कार्य सुद्धा तरुण पीढीला प्रेरणादायी ठरणारे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मीनलताई खतगावकर यांनी केले आहे. आभार गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. संतोष देवराये यांनी केले. 
यावेळी आनंद चव्हाण, विरेद्रसिंग गाडीवाले, प्रफुल सावंत, मुन्ना अब्बास, अर्पणा नेरलकर, विठ्ठल पावडे, करुणाताई जमदाडे, छायाताई कळसकर, गंगाधर बोरगावकर, नशीम जावेद खांन, पंढरीनाथ बोकारे, वसंत पवार, डॉ. विश्‍वास कदम, दिपक पावडे, शरफोद्दीन शेख, राज बहादुर कोत्तावार, बालाजी चव्हाण, नवीन राठोड, शशीकांत क्षीरसागर, राजकमलसिंग गाडीवाले, सोनाजी सरोदे, हरजिंदरसिंग गाडीवाले, छत्रुग्घन गंड्रस, भुजंग कसबे, त्रिशुल पोहरे, संजय गायकवाड, आनंदा गायकवाड, भिमराव जमदाडे, शिवराज कांबळे, उमाकांत पवार, गोविंद तोरणे, जालंधर नरवाडे, सुभाष काटकांबळे, अरुणा पुरी, रजिया बेगम, शाहीन शमदानी, सुनंदा पाटील, जयश्री राठोड, प्रणिती भरणे, सुषमा थोरात, माधव दुधभाते, जगदीश शहाणे, प्रवीण कुपटीकर, संघरत्न कांबळे, आह्यादखांन पठाण, श्रीनिवास मुरक्या, दिगांबर वाघमारे, सुधाकर एडके, साईप्रसाद महाजन, मुनवर शेख, बाबासाहेब पाटील नागठाणेकर, बालाजी लोमटे, नितीन झरीकर, राहुल देशमुख, उमाकांत सरोदे, बाळकृष्ण शिंदे आदिंची उपस्थिती होती.

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार

नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...