Thursday, February 15, 2024

पुणे येथील जमीन बेकायदेशीर इतरांना हस्तरण केल्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश

नांदेड/ प्रतिनिधी-
भांबुर्डा तालुका पुणे येथील रामोशी समाजास इंग्रज सरकारने त्यांच्या कामावर खुश होऊन  102 एकर  जमीन भेट दान दिली होती. सदरची जमीन रामोशी लोकांच्या नावाने सातबारावर नोंद असताना शासकीय कामाचे कारण पुढे करून बेकायदेशीरपणे त्यांच्याकडून सदरची जमीन जबरदस्तीने हस्तगत करण्यात आली. सदरच्या जमिनीवर पुणे महानगरपालिका पुणे पोलीस स्टेशन शिवाजीनगर ते बांधण्यात आले. उर्वरित 25 एकर जमीन शिल्लक असताना सन 2002 मध्ये  अशोकराव चव्हाण हे महसूल मंत्री असताना त्यांनी त्यांच्या जवळचे  बांधकाम व्यावसायिक कुलकर्णी,शहा, शर्मा यांना बेकायदेशीर विक्री केली. सदर प्रकरणे पुन्हा महापालिका आयुक्त झगडे  यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी देशमुख  यांना सदर जमीन ही बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या गुन्ह्याखाली सर्वांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्याची शिफारस केली होती.
 सन २०११ मध्ये विरोधी पक्षनेते  एकनाथ खडसे व देवेंद्र फडणवीसांची यांनी विधी मंडळात सदरचा प्रश्न उपस्थित केला होता. प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीने सदर प्रकरणी प्रधानमंत्री गृहमंत्री कायदेमंत्री  ईडी कार्यालय दिल्ली व मुंबई येथे तक्रार देऊन अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या दीड हजार कोटी रुपयांच्या गैर कारभाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली.त्या तक्रारीची दखल घेऊन प्रधानमंत्री कार्यालयाने सदर प्रकरण स्पष्ट असल्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याचे लेखी आदेश मुख्य सचिव मंत्रालय, महाराष्ट्र शासन मुंबई यांना दिले. पोलीस महासंचालक मुंबई यांनी पोलीस आयुक्त पुणे यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे यांनी माझा जबाब दि. 10 जानेवारी 2023 रोजी घेतला परंतु पुढील कोणतेही कारवाई केली नसल्यामुळे मी शासनास लेखी पत्र देऊन मुंबई आझाद मैदान येथे दि. 12/02/2024 पासुन बेमुदत आमरण उपोषण चालु करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचीईडी कार्यालयाकडून चौकशी होऊन त्यांना जेलमध्ये जाणे निश्चित झाले असल्यामुळे घाबरून जाऊन उपोषणाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला व आमदारकीचा राजीनामा दिला. जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे या उद्देशाने भाजपामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. जरी ते भाजपामध्ये गेले असले तरी त्यांचे जेलमध्ये जाणे निश्चित आहे.जोपर्यंत अशोकराव चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांना जेल होणार नाही व रामोशी लोकांना न्याय मिळणार नाही. तोपर्यंत प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी शांत बसणार नाही.      
                                       पंकज शिवभगत पक्षप्रमुख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  संभाजी  पाटील दरेगावकर पीएसबीपी
++++++++++++++++++++++++++++++++++

Wednesday, February 14, 2024

नांदेडची जनता धोकेबाजांना ओळखून संविधानवाद्यांच्या बाजूने उभी राहील .- फारूक अहमद

सध्या महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलेले आहे. यापूर्वी अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि भास्करराव खतगावकर यांना प्रत्येक निवडणुकीत नांदेडच्या जनतेने भक्कमपणे साथ दिलेली आहे परंतु या तिघांनीही आळीपाळीने मतदारांचा विश्वासघात करत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मस्का काँग्रेस पक्ष काढून शंकरराव चव्हाण यांनी धोका दिला,2019 ला भाजपमध्ये जाऊन खतगावकरांनी धोका दिला तर आता भाजपात जाऊन अशोक चव्हाण यांनी धोका दिला. या जोड गोळीने सातत्याने मतदारांना  फसवले  आहे मुस्लिम- बौद्धांच्या बळावर राजगादी भोगणाऱ्या या नेत्यांना बहुजनांचे प्रतिनिधीत्व तर संपवलेच परंतु जिल्ह्यातील हरीहरराव सोनुळे , फारूक पाशा, नुरूल्ला खान, साहेबराव बारडकर, शामराव कदम, जयंतराव पाटील वायपनकर, भुजंगराव किन्हाळकर, बाबासाहेब गोरठेकर, कुंटुरकर सारखे दिग्गज मराठे घराणे संपवले आहेत म्हणुन येत्या काळात सर्व बहुजन मतदारांनी ओळखने गरजेचे आहे. यापुढे मतदार गाफील राहिल्यास लोकशाही जिवंत राहणे कठीण आहे.त्यामुळे नांदेडची जनता निश्चितपणे यांना धडा शिकवतील एवढं मात्र निश्चित. नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी सैरभैर न होता या धोकेबाजांना ओळखून वंचित बहुजन आघाडीच्या सोबत भक्कमपणे उभे राहावे सर्वांचा यथोचित सन्मान केला जाईल.याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बघायला मिळतील असे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

फारुक अहमद
राज्य प्रवक्ते
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र राज्य

Thursday, February 8, 2024

विधीसंघर्षीत बालकाकडुन 1 अग्नीशस्त्र व1 जिवंत काडतुस जप्त,स्थानिक गुन्हे शाखाची कार्यवाही


नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु, शा. चे टिमला आदेश दिले होते.

दिनांक 07/02/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि / दत्तात्रय काळे यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, काळेश्वर मंदीर परीसरात, नांदेड येथे एक इसम विक्रीसाठी एक गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी स्वतःचे ताब्यात बाळगुन आहे, अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन एक विधीसंघर्षीत बालकाकडुन त्याचे नातेवाईकासमक्ष व पंचासमक्ष एक अग्नीशस्त्र (गावठी कटा) व 01 जिवंत काडतुस असा एकुण किंमती 25,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद विधीसंघर्षीत बालकाविरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / दत्तात्रय काळे, पोलीस अमंलदार बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, विलास कदम, रणधीर राजबन्सी, गणेश धुमाळ, मोतीराम पवार, हेमंत बिचकेवार स्थागुशा, नांदेड, सायबर सेलचे राजु सिटीकर व दिपक ओढणे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

आरोपी कडुन १ गावठी देशी कट्टा जप्त,इतवारा पोलिसांची कारवाई


नांदेड जिल्हयाती गुनहेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहिती काढून त्यांचेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्या बाबत. मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांना आदेशीत केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशख बाळगणारे आरोपी विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्या बाबत. इतवारा पोलीस स्टेशनच्या टिमला आदेश दिला होता. दिनांक:- ०६/०२/२०२४ रोजी
इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस, पोलीस हवलदार शेख वाजीद यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, मालटेकडी ते देगलुर नाका जाणारे रोड लगत खुबा मस्जीद समोर रोडवर नांदेड येथे एक ईसम एक गावडी बनावटीचे पिस्टल स्वताःचे ताब्यात बाळगुन थांबला आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तशी माहिती वरीष्ठांना देवुन पोलीस स्टेशन इतवारा नांदेडचे पथकाने सापळा रचुन एक आरोपी कडुन दोन पंचा समक्ष एक गावडी कट्टा / पिस्टल अग्नीशख किमंती अंदाजे १०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीतास पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे गुरनं ३७/२०२४ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे दाखल करुन आरोपीतास अटक करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड,अबिनाशकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, यांचे मार्गदर्शना खाली संतोष तांबे पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड, आयुब शेख पोलीस उप निरीक्षक, रमेश गायकवाड पोलीस.उप. निरीक्षक व पोलीस अंमलदार शेख वाजीद, धिरजकुमार कोमुलवार, सुमेध पुंडगे, मारोती गित्ते पोलीस स्टेशन इतवारा नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Friday, February 2, 2024

फारुक पाशा “आमदार चषक” क्रिकेट टुर्नामेंटचे आज उद्घाटन


नांदेडः नांदेडचे पहिले हॅट्रीक आमदार तसेच उद्योग, शिक्षण व अवकाफ विभागाचे माजी मंत्री व विधानसभेचे तत्कालीन उप-सभापती दिवंगत सय्यद फारुक पाशा यांच्या स्मृतीत आज दि. 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता “आमदार चषक” लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन मुफ्ती अयुब क़ासमी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी राज्यमंत्री व नांदेड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, माजी मंत्री सय्यद फारुक पाशा यांचे चिरंजीव फैसल पाशा, जिल्हा पत्रकार संगठनेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, नांदेड वार्ताचे मुख्य संपादक प्रदीप नागापुरकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, अल-हयात हॉस्पिटलचे संचालक डॉ अवैस अब्बासी, क्रिकेट असोसिएशनचे सचिव नंदु कुळकर्णी, माजी महापौर अजय बिसेन, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महानगराध्यक्ष अयुब खान, दक्षीण महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, दक्षीण तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, उत्तर तालुकाध्यक्ष मुकुंद नरवाडे सहीत पक्षाचे विभागीय, जिल्हा, महानगर स्तराचे पदाधिकारी व फारुक अहमद मित्र परिवार उपस्थित राहणार आहे. 

सदरील टुर्नामेंट मध्ये नांदेड महानगर व जिल्ह्यातून 16 टिमची नोंदणी झाली असुन नॉक-आउट पध्दतीने 13 सामन्यातुन अंतिम चार टिम सेमी फायनल व नंतर 11 फेब्रुवारी रोजी फायनल मॅच खेळतील तसेच अंतिम सामन्या नंतर लगेच बक्षिस वितरणाचे कार्यक्रम होणार आहे. 

सदरील सामने दररोज दोन सकाळी 9.30 व दुपारी 1.30 या वेळा पत्रकानुसार खेळवण्यात येतील व दररोज मॅन ॲाफ द मॅचची निवड करण्यात येईल. मॅचचे क्लोज शॉट बघता यावे या हेतुने स्टेडियम मध्ये एलईडी स्क्रीन सुध्दा लावण्यात येणार असुन मॅचेस बघण्यात सुध्दा प्रेक्षकांना मजा यावी याची काळजी आयोजकांनी घेतली आहे. 

या टुर्नामेंटचे आयोजन फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले असुन व्यवस्थापन समीती मध्ये क्रिकेट खेळातील तज्ञ व इंडियन मुस्लिम जिमखानाचे ज्येष्ठ खेळाडु महंमद फहीम, अथर मोमीन, मोईन अ. रहीम, जावेद हाश्मी व महंमद कासीम यांनी सर्व तांत्रीक बाजु सांभाळली आहे. 

नांदेडकरांनी या ऐतिहासीक टुर्नामेंटचे साक्षीदार होण्यासाठी श्री गुरुगोविंद सिंग स्टेडीयम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले.

Thursday, February 1, 2024

देशाला महासत्तेकडे नेणारा अर्थसंकल्प : खा. चिखलीकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठी क्रांती होत आहे. देश सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाची प्रतिमा अत्यंत प्रभावशाली राहिली असून देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही वाटचाल यशस्वी होण्यासाठी आज सादर झालेला अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अर्थ संकल्पाने महिलांना आर्थिक चाचणीतून बाहेर काढले असून घरचे बजेट ही व्यवस्थित सांभाळता यावे अशा तरतुदी केल्या आहे. घरगुती वापराच्या गॅस दरात कपात करण्यात आली आहे. शिवाय टॅक्स स्लॅब वाढू दिला नाही त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती आणि कृषी क्षेत्रालाही हा अर्थ संकल्प नवी दिशा देणारा ठरणार आहे. देशाची संरक्षण यंत्रणा अधिक भक्कम ठेवण्यासाठीही हा अर्थ संकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण , आरोग्य याही बाबींसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याने आगामी कळत भारत आर्थिक महासत्ता नक्की होईल अशी प्रतिक्रिया खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे.

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...