नांदेड/ प्रतिनिधी-
भांबुर्डा तालुका पुणे येथील रामोशी समाजास इंग्रज सरकारने त्यांच्या कामावर खुश होऊन 102 एकर जमीन भेट दान दिली होती. सदरची जमीन रामोशी लोकांच्या नावाने सातबारावर नोंद असताना शासकीय कामाचे कारण पुढे करून बेकायदेशीरपणे त्यांच्याकडून सदरची जमीन जबरदस्तीने हस्तगत करण्यात आली. सदरच्या जमिनीवर पुणे महानगरपालिका पुणे पोलीस स्टेशन शिवाजीनगर ते बांधण्यात आले. उर्वरित 25 एकर जमीन शिल्लक असताना सन 2002 मध्ये अशोकराव चव्हाण हे महसूल मंत्री असताना त्यांनी त्यांच्या जवळचे बांधकाम व्यावसायिक कुलकर्णी,शहा, शर्मा यांना बेकायदेशीर विक्री केली. सदर प्रकरणे पुन्हा महापालिका आयुक्त झगडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांना सदर जमीन ही बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या गुन्ह्याखाली सर्वांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्याची शिफारस केली होती.
सन २०११ मध्ये विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व देवेंद्र फडणवीसांची यांनी विधी मंडळात सदरचा प्रश्न उपस्थित केला होता. प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीने सदर प्रकरणी प्रधानमंत्री गृहमंत्री कायदेमंत्री ईडी कार्यालय दिल्ली व मुंबई येथे तक्रार देऊन अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या दीड हजार कोटी रुपयांच्या गैर कारभाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली.त्या तक्रारीची दखल घेऊन प्रधानमंत्री कार्यालयाने सदर प्रकरण स्पष्ट असल्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याचे लेखी आदेश मुख्य सचिव मंत्रालय, महाराष्ट्र शासन मुंबई यांना दिले. पोलीस महासंचालक मुंबई यांनी पोलीस आयुक्त पुणे यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे यांनी माझा जबाब दि. 10 जानेवारी 2023 रोजी घेतला परंतु पुढील कोणतेही कारवाई केली नसल्यामुळे मी शासनास लेखी पत्र देऊन मुंबई आझाद मैदान येथे दि. 12/02/2024 पासुन बेमुदत आमरण उपोषण चालु करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचीईडी कार्यालयाकडून चौकशी होऊन त्यांना जेलमध्ये जाणे निश्चित झाले असल्यामुळे घाबरून जाऊन उपोषणाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला व आमदारकीचा राजीनामा दिला. जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे या उद्देशाने भाजपामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. जरी ते भाजपामध्ये गेले असले तरी त्यांचे जेलमध्ये जाणे निश्चित आहे.जोपर्यंत अशोकराव चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांना जेल होणार नाही व रामोशी लोकांना न्याय मिळणार नाही. तोपर्यंत प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी शांत बसणार नाही.
पंकज शिवभगत पक्षप्रमुख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील दरेगावकर पीएसबीपी
++++++++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment