नांदेड -
शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यात संबंधित पोलीस निरीक्षकांना अपयश आले आहे. त्यातच आता टिपू सुल्तान रोड वर एका मंगल कार्यालयाच्या बाजूला मटका बुकी सुरू करण्यत आली असून या ठिकाणी अल्पवयीन मुलांना देखील प्रवेश देण्यात येत असून हा प्रकार थांबवावा अशी मागणी होत आहे.
इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटखा, मटका, ऑनलाईन लॉटरी यासह विविध अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हा परीसर अवैध धंद्याचे माहेरघर म्हणुन ओळखला जातो. त्यातच या परीसरातील दुकांनांना वेळेचे कुठलेही बंधन नाही. त्यातच आता शहरातील टिपू सुलतान रोडवर एका मंगल कार्यालयाच्या बाजूला मटका बुकी सुरू करण्यात आली असून या बुकींमुळे परिसरातील अल्पवयीन मुले मटक्याच्या नादी लागत आहेत. एवढेच नव्हे तर बंद पडलेली वाहने, हातगडे यावर मटक्याचे आकडे घेण्यात येत असून हा प्रकार थांबवावा अशी मागणी होत आहे.