Saturday, October 28, 2023

21 तलवारी व 11 खंजर अवैधरीत्या विक्री करणाऱ्या इसमास अटक स्थानिक गुन्हे शाखाची कामगिरी


नांदेड शहरात व जिल्हयात अवैधरीत्या शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी  पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी अवैध शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांची माहिती काढून आरोपीस अटक करण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.

दिनांक 27/10/2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, नगीनाघाट परिसरात एक इसम तलवारी व खंजीर त्याचे किरकोळ राहित्य विक्रीचे गाडयाचे खाली लपवून ठेवून ग्राहक आल्यास विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती.

सदर माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे नगीनाघाट परिसरात जावून छापा मारला असता सदर इसम नामे दर्शनसिंघ लाभसिंघ, वय 35 वर्ष, व्यवसाय व्यापार, रा. बंगीकला ता. तलवंडी साबोली) जि. भींडा राज्य पंजाब याचे गाडयातून 21 तलवारी व 11 खंजीर असाएकूण 36,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर ताब्यातील इसमास पुढील तपासकामी पो.स्टे. वजिराबाद यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नादेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली  व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, सपोनि रवि बाहुळे, सपोनि पांडूरंग माने, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ / गंगाधर कदम, पोहेकॉ सुरेश घुगे, पोहेकॉ / अफजल पठाण, पाहेकॉ बालाजी तेलंग, पोना/दिपक पवार, पोना / संजिव जिंकलवाड, पोकों/ तानाजी येळगे, पोकॉ/ रणधिरसिंह राजबन्सी, पोकों/विलास कदम, पोकॉ/ गजानन वयनवाड, मपोकॉ/ किरण बाबर, चापोकों / गंगाधर घुगे व चापोकों / हनुमानसिंह ठाकूर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

Thursday, October 26, 2023

जबरीने मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपीतांना 24 आताचे आत अटक , वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी, 50,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

नांदेड : दिनांक 25.10.2023 रोजी फिर्यादी मोहम्मद फैजउल्ला मोहम्मद हिदायतऊल्ला रा. दर्गापूरा कंधार यांनी पोलीस ठाणेस हजर येऊन फिर्याद दिली की, ते नातेवाईकांसोबत दवाखाण्याचे कामासाठी नांदेडला आले असतांना सकाळी 11.30 वाजताचे सुमारास कलामंदीर येथे मोबाईल फोनवर बोलत जात असतांना दोन इसम लाल रंगाच्या स्कुटीवर आले व त्यांनी कानाला लावलेला मोबाईल फोन बळजबरीने चोरुन घेऊन गेले वगैरे फिर्यादीवरुन पो.स्टे. वजीराबाद, नांदेड येथे गु.र.न. 467/2023 कलम 392,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपासकामी सदरचा गुन्हा सपोनि राम केंद्रे यांचेकडे देण्यात आला.

दुर्गादेवी विसर्जणाचे दिवशी मोबाईल स्नॅचींगचा प्रकार घडला असल्याने श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदड शहर यांनी सदरचे मोबाईल स्नॅचींग करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांना सुचना केल्या.

सदर सुचनांप्रमाणे पो. नि. अशोक घोरबांड यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे सहा, पो.नि. पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोना शरदचंद्र चावरे, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, शेख ईम्रान, पोकॉ भाऊसाहेब राठोड यांना घटना घडलेल्या परीसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज चेक करुन तसेच बातमीदार यांचेशी चर्चा करुन आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्याच्या सुचना दिल्या.

सदर सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कलामंदीर परीसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज चेक करीत असतांना त्यामध्ये शहर वाहतुक शाखेचे एक वाहन पट्रोलींग करीत असतांना आढळुन आले. सदर वाहनातील अधिकारी व अंमलदार यांना घटनेबाबत विचारणा केली असता शहर वाहतुक शाखेचे वाहन चालक सुरेश लोणीकर यांचेकडे असलेल्या दंड आकारण्याच्या डिव्हाईसमध्ये काही वाहनांच्या फोटो काढण्यात आलेल्या आढळुन आल्या. त्यामधील फोटोंची फिर्यादीकडुन पाहणी करुन घेतली असता त्यामध्ये एक स्कुटी चालकाचा फोटो आढळुन आला. त्यावरील दोन इसमांनीच माझा मोबाईल चोरी केला असल्याच फिर्यादीने पाहुन सांगितले. सदर काढण्यात आलेल्या फोटोमधील वाहनाचे क्रमांकावरुन वाहन मालकांचा शोध घेतला असता

सदरचे वाहन अक्षयकुमार किशोर घोगरे रा. शिवनगर नांदेड यांचे असल्याचे खात्री झाली. त्यांचेकडे चौकशी

करता वाहन त्यांचा मुलगा ओमकार यानी घेऊन गेले होते अशी माहीती प्राप्त झाली. त्यावरुन सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता ओमकार किशोर घोगरे, वय 23 वर्षे व्यवसाय बेकार राहणार दत्तमंदीरजवळ शिवनगर नांदेड व त्याचा मित्र गणेश राजाराम हिवराळे, वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार शिवनगर बायपास रोड नांदेड या दोघांनी सदरचा मोबाईल स्नॅचींग केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन फिर्यादीचा बळजबरीने चोरी केलेला मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली स्कुटी असा एकुण 50,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीतांना पुढील तपासकामी सपोनि राम केंद्रे व पोकॉ गणपत राठोड यांचेकडे दिले. त्यांनी नमुद आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतांना

दोन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन त्यांचेकडे ईतर गुन्हयांचे अनुषंगाने तपास चालू आहे सदरचा गुन्हा 24 तासाचे आत उघडकीस आणलेबद्दल वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.


सिडकोतील विकास कामासाठी खा. चिखलीकरांनी जाहीर केला तीन कोटीचा विकासनिधी

नवीन नांदेड (प्रतिनिधी) - सिडको परिसरातील अंतर्गत रस्ते व नाली कामासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी, नुकताच जाहीर केला आहे. सिडको हडको वाघाळा परिसरातील अंतर्गत रस्त्यासाठी 
माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर
भाजपा युवामोर्चा माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी खा. चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

सिडको हडको परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झालेलेली आसून महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे, परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 
माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर
 भाजपा युवामोर्चा माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान हडको परिसरातील गोविंद गार्डन येथील नवरात्र दुर्गादेवी आरतीसाठी सोमवार (ता.२३) रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे आले आसता त्यांनी सिडको हडको परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी तीन कोटींचा निधी जाहीर केला. या निधी अंतर्गत रामनगर, गुरुवार बाजार, वैभवनगर, जीद्दमनगर, शाहूनगर, हडको विठ्ठल मंदिर, रविवार बाजार, वाघाळा आदी भागातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. यावेळी माजी सभापती आनंदराव शिंदे ढाकणीकर, माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर, माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे अनिल पाटील बोरगांवकर, शिवराज तांबोळी, वैजनाथ देशमुख आदीसह इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Monday, October 23, 2023

पो.स्टे. भाग्यनगर व शिवाजीनगर हद्दीतील घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस, एक आरोपी अटक ,स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी

नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे  यांनी पोलीस निरीक्षक,व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने माली गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना नांदेड शहरात घरफोडी केलेला आरोपी नामे राजू ऊर्फ कॅली हा तेहरा नगर, नांदेड येथे आल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर इसमाचा शोध घेवून गुन्हयातील इसम नामे राजू ऊर्फ कॅली अशोक वाघमारे, वय 25 वर्ष, व्यवसाय मजूरी, रा. तेहरानगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

1) पो. स्टे. भाग्यनगर गुरनं 299/2023, कलम 454,457, 380 भादंवि,

2) पो.स्टे. भाग्यनगर गुरनं 300/2023 कलम 454,457, 380 भा.दं.वि. 3) पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं 153/2023 कलम 457, 380 भादंवि

सदर आरोपीकडून वरील गुन्हयातील मुद्देमाल तीन तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक अॅपल कंपनीचा IPad, एक Samsung कंपनीचा टॅब व दोन हार्डडीस्क असा एकूण 2,63,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. भाग्यनगर येथे देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड,  खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा, नांदेड, सपोनि रवि वाहुळे, सपोनि पांडूरंग माने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ / गुंडेराव करले, पोहेकॉ / अफजल पठाण, पोहेकॉ / शेख मोहसीन, पोहेकॉ / संग्राम केंद्रे, पोहेकॉ / बालाजी तेलंग, पोहेकॉ / हनमंत पोदार, पोहेकॉ / विष्णुकांत इंगळे, पोहेकॉ / रुपेश दासरवार, पोना / दिपक पवार, पोना/ संजीव जिंकलवाड, पोकॉ विलास कदम, पोकों/तानाजी येळगे, पोकों/गजानन बयनवाड, पोकों / रणधिरसिंह राजबन्सी, पोकॉ/बालाजी यादगिरवाड, पोकों/बजरंग बोडके, पोकॉ/ धम्मा जाधव, पोकों/मोतीराम पवार, पोकॉ/ ज्वालासिंघ बावरी, पोकॉ/ मारोती मोरे, सायबर सेलचे पोहेकॉ / दिपक ओढणे व पोहेकॉ /राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

Saturday, October 21, 2023

बेटी को बैंड-बाजे के साथ मायके ले गए माता-पिता, देखते रहे गए ससुराल वाले



बेटी को ससुराल में परेशान होता देख पिता ने बैंड-बाजा और आतिशबाजी के साथ बेटी को वापस घर लेकर आए. इतना ही नहीं उन्होंने नवरात्र के समय समाज को एक संदेश देने की भी कोशिश की है. दरअसल रांची के रहने वाले प्रेम गुप्ता ने साक्षी गुप्ता की शादी बड़े ही धूमधाम से की थी. लेकिन शादी के बाद से ही ससुराल वालों की तरफ से साक्षी को प्रताड़ित किया जा रहा था. इसकी जानकारी परिजनों को मिली. इसके बाद उन्होंने बेटी को वहां से निकालने का फैसला किया.
झारखंड के रांची से हैरान कर देने वाला मामला सामने आया है, जहां एक लड़की ससुराल में घुट- घुट कर जी रही थी. शादी के बाद से ही उसे प्रताड़ित किया जाने लगा था. इसके बाद पीड़िता के पिता ने ससुराल में परेशान हो रही बेटी को वापस अपने घर लाने के लिए बैंड-बाजा और आतिशबाजी के साथ बारात निकाली. जिसने भी यह नजारा देखा वो देखता ही रह गया. बेटी के इस अनोखी विदाई की चर्चा पूरे इलाके में हो रही है.

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...