Thursday, October 26, 2023

सिडकोतील विकास कामासाठी खा. चिखलीकरांनी जाहीर केला तीन कोटीचा विकासनिधी

नवीन नांदेड (प्रतिनिधी) - सिडको परिसरातील अंतर्गत रस्ते व नाली कामासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी, नुकताच जाहीर केला आहे. सिडको हडको वाघाळा परिसरातील अंतर्गत रस्त्यासाठी 
माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर
भाजपा युवामोर्चा माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी खा. चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

सिडको हडको परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झालेलेली आसून महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे, परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 
माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर
 भाजपा युवामोर्चा माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान हडको परिसरातील गोविंद गार्डन येथील नवरात्र दुर्गादेवी आरतीसाठी सोमवार (ता.२३) रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे आले आसता त्यांनी सिडको हडको परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी तीन कोटींचा निधी जाहीर केला. या निधी अंतर्गत रामनगर, गुरुवार बाजार, वैभवनगर, जीद्दमनगर, शाहूनगर, हडको विठ्ठल मंदिर, रविवार बाजार, वाघाळा आदी भागातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. यावेळी माजी सभापती आनंदराव शिंदे ढाकणीकर, माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर, माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे अनिल पाटील बोरगांवकर, शिवराज तांबोळी, वैजनाथ देशमुख आदीसह इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...