Friday, November 24, 2023

अवैद्यरित्या 12 तलवारी व 11 खंजर बाळगणारा एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे टिमला आदेश दिले होते.
दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली. की, सतर्कता जनरल स्टोअर्स नगीनाघाट नांदेड येथे एक इसमस अवैध्य रित्या तलवारी व खंजर विक्रीसाठी बाळगुन आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे परमजितसिंघ महेंद्रसिंघ रामगडीया वय 40 वर्ष रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे सतर्कता जनरल स्टोअर्स मध्ये अवैध्य रित्या 12 तलवारी व 11 खंजर किंमती 35500/- रुपयाचे विनापरवानगी बेकायदेशिर रित्या विक्रीसाठी बाळगुन मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोलीस ठाणे वजीराबाद गुरनं. 536/2023 कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पोलीस ठाणे वजीराबाद यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार अपर
पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली,
उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / परमेश्वर चव्हाण, पोहेकॉ / शंकर म्हैसनवाड, संभाजी मुंडे,
ज्वालासिंघ बावरी, चालक कलीम शेख स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस
अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Wednesday, November 22, 2023

साडे सहा तोळे सोने (किंमती चार लाख रुपये ) असलेली हरवलेली बॅगचा वजीराबाद पोलीसांकडुन शोध,( अॅटोचालकाचा प्रमाणीकपणा, सिसिटीव्ही फुटेज व ॲटो संघटनेचा बॅग शोधण्यासाठी सहभाग )


दिनांक 16.11.2023 रोजी हदगांव येथील रहीवाशी सौ. श्रीतेजा निलेश काळबांडे हया प्रभात नगर नांदेड येथील आपल्या माहेरी दिपावली सण साजरा करुन सासरी जाण्याकरीता श्रीनगर येथुन अॅटोने आपल्या लहान मुलास सोबत घेऊन बसस्थानककडे निघाल्या. त्या दरम्याण त्यांची बॅग अॅटोमध्ये राहुन गेली असल्याचे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन वजीराबाद गाठले.
अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांना घडलेल्या घटनेची आपबीती कळविली. त्यावेळी त्यांनी कळविले की, सर माझे तहानले बाळ माझ्याजवळ असल्याने त्याचे काळजी व संरक्षणाकडे लक्ष देत असतांना माझी बॅग अॅटोमध्ये राहुन गेली आहे. सदर बँगमध्ये अंदाजे साडेसहा तोळे सोन्याचे दागिणे आहेत. मी माहेरी दिपावळी साजरी करुन सासरी जात आहे. त्यातच माझे सोन्याचे दागिणे हरवले असल्याने शंका कुशंकांना वाव निर्माण करणारी बाब झाली आहे. कृपया मला आपल्या कुटुंबीतील सदस्य समजुन माझे दागिणे असलेली बॅग शोधुन द्यावी अशी विनंती केली.
सदर विनंती प्रमाणे अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक यांनी सदर महीलेची सोन्याचे दागिणे असलेली बॅग शोधण्याची जबाबदारी गुन्हे शोध पथकाचे शिवराज जमदडे, सहा. पोलीस निरीक्षक, पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोना/ शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, अरुण साखरे, शेख ईम्रान, भाऊसाहेब थोरात यांचेकडे सोपविली.
नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी श्रीनगर नांदेड ते बसस्थानक नांदेड या भागातील विविध ठीकाणचे सिसिटीव्ही फुटेज हस्तगत केले. ज्यामध्ये अॅटोचालकाचे फुटेज हस्तगत झाले परंतु नंबर अस्पष्ट असल्याने शोध घेण्यास अडथळे येत होते. तेव्हा गंगाधर प्रभाकर विणकरे, अध्यक्ष, पँथर ॲटो संघटना यांची मदत घेऊन अॅटोचालकाचा शोध घेतला. सदर प्रकरणी अॅटोचालकाचे नांव अशोक गंगाराम कांबळे रा. वैशालीनगर, पाटबंधारेनगर नांदेड असे असल्याची खात्री झाली. त्यावरुन त्यांचेकडे विचारणा करता त्यांनी सदर महिलेची बॅग जशास तशी माझेकडे असुन महीलेबाबत काहीएक माहीती मिळत नसल्याने मी सदर बॅग कोणाकडेही सुपुर्द केली नाही असे प्रामाणीकपणे कळवून बॅग समक्ष हजर केली. त्यामध्ये सदर महिलेचे साडेसहा तोळ्याचे दागिणे ज्यामध्ये ती सोन्याचे हार मिळुन आले.
आज दिनांक 22.11.2023 रोजी  श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड शहर, अॅटोचालक यांचे उपस्थितीमध्ये पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड याठीकाणी अॅटोचालक अशोक गंगाराम कांबळे यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच गंगाधर प्रभाकर विणकरे, अध्यक्ष, पँथर अॅटो संघटना यांचा व अॅटोमधील हरवलेल्या बॅगचा शोध घेणाऱ्या वजीराबाद पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार केला आहे. सदर वेळी श्रीकृष्ण कोकाटे यांनी अॅटोचालकास स्वतः तर्फे 1,000/- रुपयाचे बक्षीस दिले. तसेच सौ. श्रीतेजा काळबांडे यांनी अॅटोचालक यांचा सपत्नीक आहेर व बक्षीस देऊन सत्कार केला आहे.
सदर वेळी सौ. श्रीतेजा निलेश काळबांडे हया व त्यांचे कुटुंबीय भावनीक होऊन माझी दिपावली नांदेड पोलीसांनी भाऊबीज स्वरुपी साजरी केल्याचे मत व्यक्त केले व नांदेड पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे.

Tuesday, November 21, 2023

38 दिवसा नंतर पो.स्टे. किनवट येथील गुंतागुतीचा खुनाचा उलघडा करुन तिन आरोपी ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


दिनांक 14/10/2023 रोजी रात्री 10.19 ते 10.41 वाजताचे सुमारास किनवट येथील सामाजीक कार्यकर्ता सुरेश दत्तात्रय मस्के वय 50 वर्षे रा. हमालकॉलनी किनवट हे त्यांचे राहते घरुन पत्नीला दवाखाण्यातून आणण्यासाठी माहेर हॉस्पीटल कडे जात असतांना हमालकॉलनी जवळील मजीद जवळ कोणीतरी अज्ञात मारेकऱ्याने अज्ञात कारणासाठी अज्ञात हात्याराने डोक्यात जबर मारहाण करुन खुन केला होता. त्यावरुन त्यांची पत्नी स्नेहा सुरेश मस्के यांचे फिर्याद वरुन पो.स्टे. किनवट येथे गुरन 245/2023 कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा गुन्हा घडुन एक महीन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी सदरचे गुन्हयाचा काहीएक उलगडा होत नसल्या कारणाने मा. पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी स्थागुशा येथील दत्तात्रय काळे यांचे टिमला दिनांक 16/11/2023 रोजी आदेश दिले होते.
सदर पथकाने पो.स्टे. किनवट येथे जावुन सतत सहा दिवस कॅम्प करुन व किनवट येथील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे मदतीने सदर गुन्हयाचा बारकाईने सखोल तपास चालू केला. त्यात साक्षीदार, घटनास्थळा शेजारील साक्षीदार, तांत्रीक मदत, किनवट शहरात गोपनीय माहीतगार, मयताचे सदर भागात असलले भांडणाचे कारण असे वेगवेळया पध्दीतीने बौध्दीक कौशल्य वापरुन खुनातील अज्ञात आरोपीचा सतत शोध केला.
दिनांक 21/11/2023 रोजी पथकीतल अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहीती प्रमाण इसम नामे शेख रिहान पि. शेख रहीम वय 20 वर्षे व्यवसाय मजुरी रा. हमलाकॉलनी किनवट यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्यांने व त्याचे दोन साधादार यांनी मिळुन यातील मयत सुरेश मस्के हा शेख रिहान याचे वडीला सोबत भांडणे करुन वडीलावर खोटी केस करण्यास लावले होते तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होता. तसेच कॉलनी मध्ये दादागीरी मध्ये वावरत होता त्यावरुन त्याने व त्याचे पाहुण्याचे मुलगा नामे शेख आवेज ऊर्फ अबु पि. शेख शादुल्ला वय 22 वर्षे व्यवसाय मजुरी व शेख अशपाक पि.शेख हसन वय 20 वर्षे व्यवसाय मजुरी दोघे रा. हमालकॉलनी किनवट अशांनी मिळुन त्यास मारण्याचा कॉलनीचे शेजारी असलेली विहीरी जवळ बसुन कट रचला होता. त्याचा खुन करण्यासाठी त्याचे मागावर ते घटनेच्या आठ दिवसापुर्वी पासुन मयताचे मागावर होतो असे आरोपीतांनी सांगीतले व दिनांक 14/10/2023 रोजी रोजी रात्रीला सुरेश मस्के याचा खुन केल्याचे सांगतात त्यावरुन वरील तिघांना ताब्यात घेवुन पुढील तपास कामी पो स्टे किनवट यांचे ताव्यात दिले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगीरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड,अविनाशकुमार अपर पोलीस अधिक्षक, नांदेड,डॉ. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, रामकृष्ण मळघने उप विभागीय पोलीस अधिकारी, किनवट, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड, बी जी कऱ्हाळे, पोलीस निरीक्षक, किनवट यांचे मार्गदशनाखाली दत्तात्रय काळे, पोउपनि, पोलीस अमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, चालक शेख कलीम नेमणुक स्थागुशा व पो.स्टे. किनवट येथील सागर झाडे, पोउपनि पोलीस अमलदार गजानन डुकरे, महीला पोलीस अमलदार वर्षा ध्रुर्वे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

नांदेड शहरातील आठ हजार पूरग्रस्तांना प्रत्येकी दहा हजाराचा निधी : खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते. याचवेळी नांदेड शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे हजारो कुटुंबांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते.  त्यामुळे शेतकर्यांप्रमाने शहरातील पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यशस्वी प्रयत्न केले असून शहरातील 8057 लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत बँक खात्या जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
यावर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नांदेड शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले तर याचवेळी शहरातील सकल भागात पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या घरातील दैनंदिन साहित्यांची मोठे नुकसान झाले होते . नांदेड शहरातील जवळजवळ सर्वच सकल भागात पाणी शिरले होते . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला . सहयोग नगर भागातील नागरी वस्तीत शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तब्बल सहा तास पाण्यात थांबून अनेक नागरिकांना मदत केली होती. त्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना या बाबीची माहिती देऊन पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याची विनंती करण्यात आली होती.  याच अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे झाल्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार नांदेड शहरात एकूण 8057 लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत . पैकी  6 हजार 684 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . त्रुटी अभावी 1173 देण्यात येणारा लाभ  प्रलंबित असला तरी या अनुषंगाने महानगरपालिकेला पत्र देऊन संबंधितांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

जबरीने सोन्याची चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपीतांना 24 तासाच्या आत अटक ,वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी, 178,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

काल दिनांक 19.11.2023 रोजी सायंकाळी 05.00 वा. चे सुमारास पोलीस स्टेशन भाग्यनगर परीसरातील डॉ. देशमुख यांच्या घराजवळ एका महीलेचे दोन अनोळखी मुले दुचाकीवर येवून जबरीने त्यांच्या गळयातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन काढुन घेवून फरार झाले यावरून पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे फिर्यादी नामे सुजाली गोवर्धन भट यांचे फिर्याद वरून दोन अनोळखी / अज्ञात इसमा विरुध्द गु.र.न. 444 / 2023 कलम 392,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयातील आरोपीतांचे व वाहनाचे वर्णन तसेच आरोपीचे सीसीटीवी फुटेज वरुन आरोपीचे शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांचे आदेश झाले.
नांदेड शहरामध्ये जबरीने सोन्याच्या चैन स्नॅचींगचा प्रकार घडला असल्याने  श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदड शहर यांनी सदरचे मोबाईल स्नॅचींग करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांना सूचना केल्या. सदर सुचनांप्रमाणे पो. नि. अशोक घोरबांड यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज
जमदडे सहा, पो. नि. पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकों/ बालाजी कदम, पोकॉ/ रमेश सूर्यवंशी, शेख
ईम्रान, पोकों/भाऊसाहेब राठोड यांना घटना घडलेल्या परीसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज चेक करुन तसेच
बातमीदार यांचेकडुन माहीती प्राप्त करुन आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व सोन्याची चैन जप्त
करण्याच्या सुचना दिल्या. सदर सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर आरोपीतांपैकी एक आरोपी शेख कलीम शेख शकील रा. खडकपूरा नांदेड व दुसरा आरोपी सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद हा असुन ते सध्या खडकपूरा पाण्याचे टाकीखाली पिवळा पट्टा असलेल्या पॅशन मोटरसायकल सह असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर माहीतीवरुन आम्ही नमुद स्टाफसह 12.00 वाजता मिळालेल्या माहीतीच्या ठीकाणी छापा मारला असता
दोन इसम मोटरसायकलसह मिळुन आले. त्यांना त्यांचे नांवगांव विचारणा करता त्यांनी आपले नाव 01. सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद पिता सलीमोद्दीन, वय 44 वर्षे रा. उमर फारुखी मस्जीदजवळ लेबरकॉलनी नांदेड, 02. शेख कलीम शेख शकील, वय 22 वर्षे रा. खैरलुम ऊर्दु शाळेजवळ खडकपूरा नांदेड असे असल्याचे सांगितले. त्यांना विषयांकीत नमुद गुन्हयाबाबत विचारणा करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगुन गुन्हा करतांना हीच मोटरसायकल सोबत होती असे सांगितले. त्यावरुन जवळच असलेल्या दोन पंचासमक्ष त्यांचे ताब्यात मिळुन आलेली. मोटरसायकल तसेच त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद पिता सलीमोद्दीन, वय 44 वर्षे रा. उमर फारुखी मस्जीदजवळ लेबरकॉलनी नांदेड यांचे उजव्या बाजुच्या पॅन्टच्या खिशामध्ये खालील वर्णनाची सोन्याच्या धातुसारखी असलेली चैन असे दोघांकडुन फिर्यादीचा बळजबरीने चोरी केलेली सोन्याची चान वा गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 178,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर दोन्ही आरोपीतांचा पूर्व गुन्हे अभिलेख पडताळले असता आरोपी नामे सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद पिता
सलीमोद्दीन, याचेवर पो.स्टे शिवाजीनगर व भाग्यनगर येथे चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी
नामे शेख कलीम शेख शकील याचेवर पो.स्टे वजीराबाद येथे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांना पुढील
तपासकामी पो.स्टे भाग्यनगर यांच्याकडे देण्यात आले आहे. सदरचा गुन्हा 24 तासाचे आत उघडकीस आणलेबद्दल वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...