नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते. याचवेळी नांदेड शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे हजारो कुटुंबांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकर्यांप्रमाने शहरातील पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यशस्वी प्रयत्न केले असून शहरातील 8057 लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत बँक खात्या जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
यावर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नांदेड शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले तर याचवेळी शहरातील सकल भागात पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या घरातील दैनंदिन साहित्यांची मोठे नुकसान झाले होते . नांदेड शहरातील जवळजवळ सर्वच सकल भागात पाणी शिरले होते . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला . सहयोग नगर भागातील नागरी वस्तीत शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तब्बल सहा तास पाण्यात थांबून अनेक नागरिकांना मदत केली होती. त्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना या बाबीची माहिती देऊन पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याची विनंती करण्यात आली होती. याच अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे झाल्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार नांदेड शहरात एकूण 8057 लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत . पैकी 6 हजार 684 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . त्रुटी अभावी 1173 देण्यात येणारा लाभ प्रलंबित असला तरी या अनुषंगाने महानगरपालिकेला पत्र देऊन संबंधितांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment