एमआयएमच्या नांदेड उत्तर शहराध्यक्षपदी रुक्साना बेगम
नांदेड - एमआयएमच्या नांदेड उत्तर महिला शहराध्यक्ष रुक्सान बेगम शेख याहिया तर दक्षिण महिला शहराध्यक्षपदी रेश्मा बेगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येथील एमआयएमच्या मराठवाडा कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला, मराठवाडा सचिव कलक रमजानी, जिल्हध्यक्ष मिर्झा अहेमद बेग, युवा जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, महानगराध्यक्ष साबेर चाऊस, महानगर सचिव शेख बशिर लाला यांची उपस्थिती होती. यावेळी देगलूर नाका येथील रुक्साना बेगम यांना उत्तर शहराध्यक्ष तर रेश्मा बेगम यांच्यांवर नांदेड दिक्षणची जबाबदारी सोपविण्यात आली.
या कार्यक्रमात साजेब अली, सोहेल पटेल, सिकंदर शेख, हैदर पटेल, नुरुद्दीन शेख, युसुफ पटेल यांची उपस्थिती होती.