Monday, September 26, 2022

नरसी येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण ?

 


नायगाव तालुक्यातील नरसी येथील हैद्राबाद मार्गावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत अतिक्रमण  करण्यात आले असून बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
नरसी येथील हैद्राबाद मार्गावर शासकीय विश्रामगृह असून विश्रामगृह शेजारी राज्यातील एका प्रमुख पक्षाच्या तालुकाप्रमुखची जमीन आहे. या पदाधिकाऱ्याने शासकीय विश्रामगृहच्या जमिनीत बांधकाम करण्यास सुरुवात केल्याने ही जमीन कुणाची असा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे. जमीन शासनाची की या पदाधिकाऱ्याची या संभ्रमात जनता आहे. तर दुसरीकडे बांधकाम विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने या अतिक्रमणास बांधकाम विभागाचा पाठिंबा आहे की काय अशी चर्चा सुरू आहे.
असेच प्रकार नायगाव , नरसी भागात सुरू आहेत. राजकीय दाबावाचा वापरून करून शासकीय जमिनी हडप करण्यात येत आहेत.बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन जमिनी वाचवाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांतून होत आहे.

No comments:

Post a Comment

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार

नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...