राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न परंतु सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यात येणारे वेदांत फॉक्सान हा उद्योग केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन गुजरातकडे वळविण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसच्यावतीने आयटीआय चौक येथे निषेध आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू होत्या. वेदांत फॉक्सान उद्योग राज्यात येणार होता. परंतु घातपात करून केंद्रीय सत्तेचा वापर करत राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार केंद्रीय सत्तेपुढे लोटांगण घालत सदरील उद्योग गुजरातला पाठवित आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय चौक याठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात निरीक्षक निशांत वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, युवक शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, दक्षिण अध्यक्ष माधव चिंचाळे, उत्तर अध्यक्ष निखील नाईक, जिल्हा शहर सचिव मोहम्मद सरफराज अहेमद, संघटक अ. सत्तार, आतिक बिल्डर, शफी उर रहेमान, युनूस खान, गुलाम मोबीन, मोहम्मद मुस्ताक, अॅड. खादरी, विक्रम ठाकूर, नितीन झुंझारे, सिंधुताई देशमुख, प्रसेजनीतकौर कोल्हापुरे, हसीना बेगम, मोहम्मद मोबीन, लखन वाघमारे, विजय रणखांबे, अनिल मल्हारे, साहेबराव गोमसकर, जफार पठाण, अ. रज्जाक, अविनाश वाघमारे, गणेश जोंधळे, सय्यद मोहम्मद, विजय घोगरे, प्रमोद कांबळे, ओंकार वाघमारे, आकाश वाघमारे, विक्कीसिंघ गील, शंतनु पाटील, अब्दुल गफार, फिरदोस खान, सय्यद कलीम, महेंद्र भटलाडे, शेख खदीर, गोविंद यादव, जिलानी भाई, प्रमोद नरवाडे, पंकज कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment