नांदेड : एखाद्या माणसाची भामटेगिरी किती खालच्या थराला जाऊ शकते आणि आपल्या घरातील शुभ कार्यासाठी इतरांसमोर कसे आहात पसरले जातात याची चर्चा सध्या नांदेड पोलीसंसह , गुटखा, वाळू माफिया आणि काही राजकीय लोकातून होत आहेत. माझ्या घरी लग्नकार्य आहे तुम्ही अमुक अमुक जबाबदारी घेता का अशी याचना करत हा भामटा हात पसरत असल्याची केविलवाणी परिस्थिती चर्चेत आली आहे.
एखाद्या क्षेत्रात काम करत असताना त्या क्षेत्रात तरबेज होणे निपुण होणे हे माणसातील चांगुलपणाचे लक्षण. हा चांगुलपणा अंगी घेऊन समाजाच्या भल्यासाठी विविध क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपले योगदान देणे हेही माणुसकीचे लक्षण परंतु डबक्याला सागर समजून बेडका प्रमाणे ड्राव ड्राव करून उगाच विनाकारण भीती घालून पैसा गोळा करण्याचा गोरख धंदा गेल्या काही वर्षापासून नांदेड नांदेड शहरात हा भामटा करीत असल्याचे दिसून येते . पैसे उकळण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या या महामहीम बोरू बाहद्दरणे पोलीस प्रशासनाला अक्षरशः चघळून चघळून सोडले आहे . पोलीस दलात काम करत असताना छोट्या-मोठ्या त्रुटी छोट्या मोठ्या उणिवा राहत असतात परंतु या उणिवांची माहिती मिळवून त्याचा गैरफायदा घेत पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या या बोरूबहादराने यापूर्वीही लाखोंची माया गोळ्या केल्याची चर्चा आहे. पोलीस खाते आपल्या खिशात असल्याचा बनाव करत अनेक पोलीस अधिकाऱ्यांना भेडसावण्याचा प्रयत्नही त्यांनी केल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले. एवढेच नाही तर हप्ते वसुलीसाठी दमदाटी होते अशी चर्चा आहे .ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याला काही मिळाले नाही त्या पोलीस अधिकाऱ्याची बदनामी करण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी हा भामटा ठेवतो. विशेष बाब कोणीही विचारो न विचारी पण माझे शहाणपण सर्वोत्तम आहे हे दाखवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न करणारा हा चोटा किती नीच थराला जाऊ शकतो याची असंख्य उदाहरणे अनेक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत.
असो, असे असले तरी येत्या काही आठवड्यात या महाभागाच्या घरी एक शुभकार्य होत आहे. या शुभ कार्यासाठी आमच्याही शुभेच्छा . परंतु या शुभेच्छा देत असताना या शुभ कार्यासाठी या भामट्याने अनेकांच्या खिशाला कात्री लावली आहे . ताट, तांब्या, वाटी, ग्लास, चमचा, कुकर, मिक्सर घेऊन देण्यासाठी याने अनेकांना गळ घातल्याची चर्चा होते. काही जणांना पाण्यासाठी सांगितले तर काही जणांना जेवणासाठी तर काहीजणांना वरातीतल्या बँड वाल्याचे पैसे देण्यासाठीही सांगितल्याची चर्चा आहे . त्यामुळे स्वतःला अराबोपती समजणाऱ्या आणि तसे भासविणाऱ्या भामट्याची औकात आता समोर आली आहे. त्यामुळे स्वतःला लेखणी सम्राट समजणाऱ्या या भामट्याची दयनीय अवस्था आणि केवलवान्या परिस्थितीची मात्र अनेक जणांकडून कीव केली जात आहे.
माणसाने माणुसकीत राहून माणूसपण कमवावे असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते .आणि खऱ्या अर्थाने हीच सामाजिक मानसिकता प्रत्येकाने बाळगायला हवे. परंतु स्वतःपेक्षा आपण खूपच ज्ञानी , शहाणे आणि मोठे तीर मारणारे आहोत असे दाखवून देण्याचा एक ना एक दिवस भांडाफोड होतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे .दुर्दैवाने या बाबी लक्षात न ठेवता आपले शहाणपण धुरा सोबत हवेत उडवणाऱ्या या अति विराट शहाण्या माणसाच्या विविध प्रकारच्या चर्चा आता रंगात आहेत . एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे हात पसरून केविलवाण्या प्रकाराची आता चर्चा रंगली आहे. असे असले तरी होणाऱ्या शुभकार्यासाठी मात्र आमच्या मनस्वी शुभेच्छा . भविष्यात अशा शुभकार्यासाठी हा भामटा कोणापुढे हात पसरणार नाही . कोणालाही धमक्या देणार नाही किंवा कोणालाही वेठीस धरणार नाही यासाठी ईश्वर त्याला शहाणपण देओ ही आमच्याकडून शुभेच्छा.शेवटी आम्ही माणुसकी जपतो. भामटापणा नाही हे ही महत्वाचे.

शाळेतलीत गुंडाळुन जोडे.
ReplyDelete