Thursday, February 8, 2024

आरोपी कडुन १ गावठी देशी कट्टा जप्त,इतवारा पोलिसांची कारवाई


नांदेड जिल्हयाती गुनहेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहिती काढून त्यांचेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्या बाबत. मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांना आदेशीत केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशख बाळगणारे आरोपी विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्या बाबत. इतवारा पोलीस स्टेशनच्या टिमला आदेश दिला होता. दिनांक:- ०६/०२/२०२४ रोजी
इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस, पोलीस हवलदार शेख वाजीद यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, मालटेकडी ते देगलुर नाका जाणारे रोड लगत खुबा मस्जीद समोर रोडवर नांदेड येथे एक ईसम एक गावडी बनावटीचे पिस्टल स्वताःचे ताब्यात बाळगुन थांबला आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तशी माहिती वरीष्ठांना देवुन पोलीस स्टेशन इतवारा नांदेडचे पथकाने सापळा रचुन एक आरोपी कडुन दोन पंचा समक्ष एक गावडी कट्टा / पिस्टल अग्नीशख किमंती अंदाजे १०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीतास पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे गुरनं ३७/२०२४ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे दाखल करुन आरोपीतास अटक करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड,अबिनाशकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, यांचे मार्गदर्शना खाली संतोष तांबे पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड, आयुब शेख पोलीस उप निरीक्षक, रमेश गायकवाड पोलीस.उप. निरीक्षक व पोलीस अंमलदार शेख वाजीद, धिरजकुमार कोमुलवार, सुमेध पुंडगे, मारोती गित्ते पोलीस स्टेशन इतवारा नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Friday, February 2, 2024

फारुक पाशा “आमदार चषक” क्रिकेट टुर्नामेंटचे आज उद्घाटन


नांदेडः नांदेडचे पहिले हॅट्रीक आमदार तसेच उद्योग, शिक्षण व अवकाफ विभागाचे माजी मंत्री व विधानसभेचे तत्कालीन उप-सभापती दिवंगत सय्यद फारुक पाशा यांच्या स्मृतीत आज दि. 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता “आमदार चषक” लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन मुफ्ती अयुब क़ासमी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी राज्यमंत्री व नांदेड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, माजी मंत्री सय्यद फारुक पाशा यांचे चिरंजीव फैसल पाशा, जिल्हा पत्रकार संगठनेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, नांदेड वार्ताचे मुख्य संपादक प्रदीप नागापुरकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, अल-हयात हॉस्पिटलचे संचालक डॉ अवैस अब्बासी, क्रिकेट असोसिएशनचे सचिव नंदु कुळकर्णी, माजी महापौर अजय बिसेन, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महानगराध्यक्ष अयुब खान, दक्षीण महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, दक्षीण तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, उत्तर तालुकाध्यक्ष मुकुंद नरवाडे सहीत पक्षाचे विभागीय, जिल्हा, महानगर स्तराचे पदाधिकारी व फारुक अहमद मित्र परिवार उपस्थित राहणार आहे. 

सदरील टुर्नामेंट मध्ये नांदेड महानगर व जिल्ह्यातून 16 टिमची नोंदणी झाली असुन नॉक-आउट पध्दतीने 13 सामन्यातुन अंतिम चार टिम सेमी फायनल व नंतर 11 फेब्रुवारी रोजी फायनल मॅच खेळतील तसेच अंतिम सामन्या नंतर लगेच बक्षिस वितरणाचे कार्यक्रम होणार आहे. 

सदरील सामने दररोज दोन सकाळी 9.30 व दुपारी 1.30 या वेळा पत्रकानुसार खेळवण्यात येतील व दररोज मॅन ॲाफ द मॅचची निवड करण्यात येईल. मॅचचे क्लोज शॉट बघता यावे या हेतुने स्टेडियम मध्ये एलईडी स्क्रीन सुध्दा लावण्यात येणार असुन मॅचेस बघण्यात सुध्दा प्रेक्षकांना मजा यावी याची काळजी आयोजकांनी घेतली आहे. 

या टुर्नामेंटचे आयोजन फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले असुन व्यवस्थापन समीती मध्ये क्रिकेट खेळातील तज्ञ व इंडियन मुस्लिम जिमखानाचे ज्येष्ठ खेळाडु महंमद फहीम, अथर मोमीन, मोईन अ. रहीम, जावेद हाश्मी व महंमद कासीम यांनी सर्व तांत्रीक बाजु सांभाळली आहे. 

नांदेडकरांनी या ऐतिहासीक टुर्नामेंटचे साक्षीदार होण्यासाठी श्री गुरुगोविंद सिंग स्टेडीयम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले.

Thursday, February 1, 2024

देशाला महासत्तेकडे नेणारा अर्थसंकल्प : खा. चिखलीकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठी क्रांती होत आहे. देश सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाची प्रतिमा अत्यंत प्रभावशाली राहिली असून देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही वाटचाल यशस्वी होण्यासाठी आज सादर झालेला अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अर्थ संकल्पाने महिलांना आर्थिक चाचणीतून बाहेर काढले असून घरचे बजेट ही व्यवस्थित सांभाळता यावे अशा तरतुदी केल्या आहे. घरगुती वापराच्या गॅस दरात कपात करण्यात आली आहे. शिवाय टॅक्स स्लॅब वाढू दिला नाही त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती आणि कृषी क्षेत्रालाही हा अर्थ संकल्प नवी दिशा देणारा ठरणार आहे. देशाची संरक्षण यंत्रणा अधिक भक्कम ठेवण्यासाठीही हा अर्थ संकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण , आरोग्य याही बाबींसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याने आगामी कळत भारत आर्थिक महासत्ता नक्की होईल अशी प्रतिक्रिया खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे.

Wednesday, January 24, 2024

ग्रामीण गुन्हे शोध पथकाची कारवाई मोबाईल,खंजर एक दुचाकी वाहन मुद्देमालसह आरोपीला केले गजाआड

नांदेड। पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दित
मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन
मोबाईल चोरीचे प्रमाण कमी करुन मोबाईल चोराना
अटक करुन गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त
करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक
, अबिनाश कुमार, अपर पोलीस
अधिक्षक, सुशीलकुमार नायक,
उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा,
नांदेड यांनी सदर मोबाईल चोरीना आळा घालुन
आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी एन.एस.आयलाने, पोलीस निरीक्षक, श्रीधर जगताप, सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील महेश कोरे, पोलीस उप निरीक्षक, विक्रम वाकडे, प्रभाकर मलदोडे, ज्ञानोबा कवठेकर, शेख सत्तार मगदुम, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, शिवानंद तेजबंद, श्रीराम दासरे, शिवानंद कानगुले, सायबर सेल नांदेड यांना योग्य त्या सुचना देवुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दाखल असलेला गु.र.नं. 855/2023
कलम 379 भा.दं.वी. तसचे गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. मधील चोरीस गेलेला मोबाईल व अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले असता गुन्हे शोध पथकातील प्रमुख व अंमलदार यांनी आपले कौशल्य वापरुन गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीसानी सापळा रचुन आरोपी नामे शेख समीर शेख चाँद वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. घर नं.535 वाजेगाव, नांदेड यास ताब्यात घेवुन नमुद दाखल गुन्हयासंबंधाने व इतर मोबाईल चोरीतील गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असताना सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करुन पाच मोबाईल काढुन दिले. ते मोबाईल नांदेड ग्रामीण पोलीसानी जप्त केले आहेत. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
सदर गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात अधिक तपास सपोउपनि शेषराव शिंदे पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. गुन्हयात आरोपी 1) सुमीत संतोष सरोदे वय 19 वर्ष रा. सिडको, नांदेड, 2) अजय उर्फ लड्या भगवान जोगदंड वय 22 वर्ष रा. सिडको, नांदेड, 3) साईनाथ लक्ष्मण सरसमकर वय 32 वर्ष रा. सिडको, नांदेड यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयात गेलेला मुद्देमाल काढुन दिला. तसेच गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली मोटार सायकल व एक खंजर जप्त करण्यात आला आहे. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

सदर गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात अधिक तपास महेश गायकवाड पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत आहेत. सदर गुन्हयातील आरोपीकडुन जप्त करण्यात आलेले मोबाईल मुळ मालकाना परत करण्यासाठी सदर मोबाईलचे IMEI नंबर वरुन शोध घेण्याकरिता सायबर सेल नांदेड यांना पत्र पाठवण्यात आले आहे. व जिल्हातील इतर पोलीस स्टेशनला बिनतारी संदेश पास केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत व केलेल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील टिमचे श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा, नांदेड यांनी अभिनंदन केले आहे.

नांदेड शहरातील मटका जुगार चालक कमल यादव सहा महिण्यासाठी हद्दपार ( जिल्हा जालना येथे जिल्हयाबाहेर सोडण्यात आले)


नांदेड;श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक,अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, इतवारा अति. पदभार उपविभाग नांदेड शहर, यांनी जिल्हयातील अभिलेखावरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाया करण्याच्या सुचना गुन्हे बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वजीराबाद हद्दीतील अनेक गुन्हेगारांविरुध्द पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाने कार्यवाही केली होती.
पोलीस ठाणे अभिलेखावरील मटका जुगार चालक कमलकिशोर गणेशलाल यादव, रा. दिलीपसिंघ कॉलनी नांदेड यांचेविरुध्द मटका जुगार व शरीराविरुध्दचे एकुण (39) गुन्हे दाखल असल्याचा अभिलेख आढळुन आल्याने त्यांचेविरुध्द नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर या चार जिल्हयातुन हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव मा. उप विभागीय दंडाधिकारी, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला होता.
सदरचे प्रकरण  विकास माने, उप विभागीय दंडाधिकारी, नांदेड यांचेकडे चालविण्यात आले. प्रकरणात त्याचे कार्यालयीन आदेश क्र. 2023/हद्दपार/एमजी/सिआर-3/जा.क्र.161 उप विभागीय दंडाधिकारी, कार्यालय, नांदेड दिनांक 01.01.2024 अन्वये कमलकिशोर गणेशलाल यादव उर्फ बटावाले रा. दिलीपसिंघ कॉलनी याचे विरुध्दचा हद्दपारीचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला असुन त्यास सहा महिण्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यास तीन दिवसाचे आत नांदेड जिल्हा सोडुन जाणे बाबत व नादेड जिल्हयाच्या परीसरात सहा महिण्यापर्यंत प्रवेश करु नये असे आदेश पारीत करण्यात आले आहेत.
सदर आदेशाप्रमाणे अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय मंठाळे, शिवराज जमदडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/329 मेघराज पुरी यांनी सदरचे आदेश कमलकिशोर गणेशलाल यादव यास तामील केले. आदेशाप्रमाणे कलमकिशोर गणेशलाल यादव यास नांदेड जिल्हयातुन जालना जिल्हयामध्ये सोडुन हद्दपारीचे आदेश पारीत केले आहेत.
नांदेड शहरातील जनतेस आवाहण करण्यात येते की, सदरचा हद्दपार करण्यात आलेला ईसम हा नांदेड शहर व नांदेड जिल्हयात आढळुन आल्यास त्याबाबतची माहीती खालील नमुद संपर्क क्रमांकावर कळविणेस विनंती आहे.

01. पो.स्टे. वजिराबाद कार्यालय नंबर - 02462-2236500

02. मा. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड -9823333377

03. मा. सहा. पोलीस निरीक्षक, शिवराज जी. जमदडे, -9890396652

04. पोलीस हेल्प लाईन क्रमांक 112 वर संपर्क करावा.

उर्वरीत प्रलंबीत प्रस्तावातील जास्तीत जास्त गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कार्यवाही पोलीस विभागाकडुन करण्यात येत आहेत.

Thursday, January 4, 2024

संभ्रम निर्माण करणार्‍यांनी दुसऱ्यांदा आजमावून पाहवेआगामी लोकसभा निवडणूक लढविणार-खा.चिखलीकर

नांदेड-नांदेड लोकसभेच्या निवडणूकीत पक्षश्रेष्ठी दुसर्‍यांदा संधी उपलब्ध करुन देतील या विश्‍वासावरच आपण आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागलो आहे. नांदेड भाजपाची जागा डळमळीत असल्याचा संभ्रम निर्माण करणार्‍या अशोक चव्हाणांनी दुसर्‍यांदा आजमावून पाहण्यासाठी निवडणूकीच्या मैदानात उतरावे, ते भाजपात येवोत अथवा न येवोत मी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचा दावा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. हा राम उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेनी आपल्या घरात राम ज्योती लावून दीपोत्सव दिवाळीसारखा साजरा करावा. माझ्या वतीने 2 लक्ष राम ज्योतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी खा.चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेवून संवाद साधला असता पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी अशोक चव्हाण यांना निवडणूकीत उतरण्याचे आव्हान केले आहे. या पत्रकार परिषदेस भाजपाचे माजी संघटन सचिव गंगाधर जोशी, माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे, भाजपा प्रवक्ते प्रल्हाद उमाटेआदिंची उपस्थिती होती.
येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत 12.20 मिनिटांनी रामलला भव्य दिव्य मंदिरात विराजमान होत आहेत. हा राम उत्सव जिल्ह्यातील सर्व जनतेनी आपल्या घरावर व गावातील मंदिरावर रोषनाई करुन लक्ष लक्ष राम ज्योती पेटवून दिपोत्सव साजरा करण्याचे आवाहन खा.चिखलीकर यांनी केले. खासदाराच्यावतीने2 लाख राम ज्योतीचे वाटप करण्यात येणार आहे. गावातील राम मंदिर असो की हनुमान मंदिरात भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करुन मोठ्या उत्साहात रामललाच्या भव्य दिव्य मंदिरातील आगमनाचे दीपोत्सव साजरे करुन स्वागत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संघ परिवाराच्यावतीने आयोध्येतून आलेल्या आक्षता वाटपाला घरोघरी जावून सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व कारसेवकांचा सत्कार भाजपाच्यावतीने करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात येतील असा दावा खा.चिखलीकर यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले, नांदेड भाजपाची जागा डळमळीत असल्यामुळे माझ्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या उठवित आहेत. मी भाजपात गेल्यास खासदाराला अवघड होईल असा गर्भित इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला. त्याला प्रतिउत्तर देताना खा.चिखलीकर म्हणाले, भाजपात येवून तर बघा कोणाला अवघड होईल ते कळेल. भाजपाची जागा डळमळीत असल्याचा संभ्रम पसरविणार्‍या अशोक चव्हाणांनी दुसर्‍यांदा निवडणूकीच्या मैदानात उतरुन आजमावून पाहवे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
दाजी-भावजी खासदार असताना रेल्वेचा एकही प्रश्‍न मार्गी लावण्यात त्यांना यश आला नाही. माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात रेल्वेचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. नांदेड-बिदरचा प्रश्‍न निकाली निघाला असून या मार्गाच्या कामाचा शुभारंभ होण्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस सुरु केली. नांदेड-तिरुपती आठवड्यातून चार वेळा रेल्वे सुरु झाली. नांदेड-पुणे रेल्वे नियमीतपणे सुरु झाली. नांदेड रेल्वे स्थानकाची नव्याने भव्य-दिव्य इमारत बांधण्यासाठी 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून येत्या काळात नांदेड रेल्वे स्थानकाच्या बांधकामाचे काम सुरु होणार आहे. पाईपलाईनव्दारे घरगुत्ती गॅस कनेक्शन पुरवठा करणारा मोठा प्रकल्प नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाला असून त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. दाजी-भावजी खासदार असताना त्यांनी जेवढी कामे केली त्यापेक्षा दुप्पटीने माझ्या खासदारकीच्या काळात दुप्पटीने विकास कामे झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
खासदार जनतेच्या दारी हे ध्येय उराशी बाळगून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवून करण्यासाठी एक दिवसही घरात न बसता सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होवून जनतेशी थेट संपर्क ठेवणारा भाजपाचा एकमेव खासदार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी योजनेचा फायदा जिल्ह्यातील लाखो नागरीकांना झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात नरेंद्र मोदी हेच तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत ही भावना निर्माण झाली असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातून पुन्हा एकदा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वासही खा.चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

Wednesday, January 3, 2024

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराफा लाईन परीसरातील खुनाच्या गुन्हयातील आणखी एक आरोपी अटक

सराफा लाईन इतवारा, नांदेड परीसरात दिनांक 06/11/2023 रोजी रात्री 8.00 वाजताचे सुमारास सागर यादव रा. जुनागंज इतवारा, नांदेड याचा काही इसमांनी खुन केला होता त्यावरुन पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120 (ब) भा. द. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल असुन नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी पथके तयार करुन आरोपीतांना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक 02/01/2023 रोजी स्थागूशा चे पथकातील पोउपनि / दत्तात्रय काळे यांना मिळालेल्या माहीतीनुसार नमुद गुन्हयातील एक आरोपी नगीनाघाट, नांदेड येथे असल्याने पोलीस निरीक्षक, स्थागुशा यांनी सदर पथकास नगीनाघाट, नांदेड येथे रवाना केले. स्थागुशा चे पथकाने नमुद ठिकाणी जावुन सापळा रचुन आरोपी नामे 1 संतोष भिमराव सोळंके वय 22 वर्ष व्यवसाय मजुरी रा. गायत्रीमंदीर जवळ, जुना मोंढा, नांदेड यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे सांगीतल्याने त्यास पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120 (ब) भा. द. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम गुन्हयाचे पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड,  खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, पोहेकॉ / बालाजी तेलंग, पोकॉ/ विलास कदम, विठ्ठल शेळके, गजानन बयनवाड, रणधीर राजबन्सी, ज्वालासिंघ बावरी, कलीम शेख,मारोती मुंडे, स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार

नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...