Saturday, November 26, 2022

नांदेड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणुन एकुण ७,२३,०००/- रूपयांचा मुद्देमाल केला जप्त

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणुन दरोड्यातील चार आरोपी कडून दरोडा व जबरी चोरी मधील एकुण १४ मोबाईल व १२ मोटार सायकल, ७०००/- रूपये व गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यारांसह एकुण ७,२३,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत दिनांक १७ नोव्हेंबर रोजी कोहीनूर मिल जवळ तिघा जणांस अज्ञात आरोपीतांनी त्यांचेकडील धारधार हत्याराने दुखापत करून त्यांचेकडून जबरीने मोबाईल काढून घेऊन पळून गेले. त्यानंतर दिनांक १८ नोव्हेंबर रोजी रात्री ०९:३० वाजताचा सुमारास भगवान बाबा चौक ते वाघाळा जाणारा रोडवर फिर्यादी परबता गणपती सुरेवाड रा. भगवानबाबा चौक नांदेड यास व त्यांचे साथीदार मित्रांस दोन मोटार सायकलवर आलेल्या पाच अनोळखी चोरट्यांनी त्यांचे जवळील धारधार शस्त्राने त्यांचेवर वार करून गंभीर दुखापत करून त्यांचेजवळील मोबाईल व नगदी ७०००/- रूपये जबरीने काढून घेऊन पळून गेले. या घटनेवरून पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गुरनं. ६८०/२०२२ कलम ३९५,३९७,४२७ भादंवि सह कलम ४/२५,४/२७ माहका व गुरनं ६९५/२०२२ कलम ३९४,३४ भादंवि सह कलम ४/२५,४/२७ भाहका अन्वये गुन्हा दाखल आहे.
श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड, अविनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड व सिद्धेश्वर मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागाग इतवारा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हदीत मागील एका महीन्यात घडलेल्या दरोडा व जबरी चोरी गुन्ह्यातील आरोपींचे शोध घेण्यासाठी दाखल गुन्ह्यामधील तपास जलद होण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे गुन्हे शोध पथक यांना गुन्हे उघड करण्याबाबत योग्य त्या सुचना देऊन केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोधपथकातील पो.उप.नि. आनंद विचेवार, पोहेकॉ/२४३४ प्रमोद कन्हाळे, पोहेकॉ / ७४१ प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ / ४९२ संतोष जाधव, पोहेकॉ २१२७ बालाजी लाडेकर, पोकी/३३७६ चंद्रकांत स्वामी, पोकों/१०७३ विश्वनाथ पवार यांनी गोपनिय माहीतीगारामार्फत माहीती काढून गुन्हा करणाऱ्या अज्ञात आरोपींचे नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन आरोपी सुबोध ऊर्फ बबलु पि. सुनिल वडगावकर वय २१ वर्षे व्यवसाय बेकार रा. शनिमंदीराजवळ हडको, नांदेड. वैभव राजु हुंडे वय २० वर्षे व्यवसाय बेकार रा. दत्त मंदीराजवळ सिडको, नांदेड. मानव बालाजी मुरकुटे वय २१ वर्षे व्यवसाय बेकार रा.मातोश्री नगर सिडको, नांदेड. रोहीत विजयकुमार कदम वय २० वर्षे रा. दत्त मंदीराचे पाठीमागे, विष्णुपुरी नांदेड. यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून पो.स्टे. नांदेड ग्रामीण हद्दीत केलेल्या गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करून सदर आरोपीकडून दरोडा व जबरी चोरी, मो.सा. चोरी मधील एकुण १२ मोटार सायकल व १४ अँड्रॉइड मोबाईल. तसेच दरोडयाच्या व जबरी चोरीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा करण्यासाठी वापरले हत्यार. व गुन्ह्यातील नगदी ७०००/- रूपये असा एकुण ७,२३,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून चोरीस गेलेल्या आणखीन मोटार सायकल व मोबाईल जप्त होण्याची शक्यता आहे.
संबंधीत कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक अशोक धोरबांड यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि आनंद विधेवार, पोहेकॉ / २४३४ प्रमोद कन्हाळे, पोहेकी ७११ प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ ४९२ संतोष जाधव, पोहेको/ २१२७ बालाजी लाडेकर, पोक / ३३७६ चंद्रकांत स्वामी, पोकों/१०७३ विश्वनाथ पवार पोना १२४३ ज्ञानोबा कवठेकर, पोकां/ २८६६ शिवानंद कानगुले यांनी गुप्त बातमीदारांमार्फतीने माहीती काढून व प्रत्येकाने वेगवेगळे कौशल्य वापरून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहीती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदर उल्लेखनिय कामगीरीबाबत निसार तांबोळी पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड, श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड, अविनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड,  सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Thursday, November 24, 2022

माझ्या घरी लग्न आहे तुम्हीही मदत करा की : भामट्याने पसरले पोलीस, माफिया ,कार्यकर्त्यांसमोर हात

 नांदेड : एखाद्या माणसाची भामटेगिरी किती खालच्या थराला जाऊ शकते आणि आपल्या घरातील शुभ  कार्यासाठी इतरांसमोर कसे आहात पसरले जातात याची चर्चा  सध्या नांदेड पोलीसंसह , गुटखा, वाळू माफिया आणि काही राजकीय लोकातून होत आहेत. माझ्या घरी लग्नकार्य आहे तुम्ही अमुक अमुक जबाबदारी घेता का अशी याचना करत हा भामटा हात पसरत असल्याची केविलवाणी परिस्थिती चर्चेत आली आहे.

एखाद्या क्षेत्रात काम करत असताना त्या क्षेत्रात तरबेज होणे निपुण होणे हे माणसातील चांगुलपणाचे लक्षण.  हा चांगुलपणा अंगी घेऊन समाजाच्या भल्यासाठी विविध क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपले योगदान देणे हेही माणुसकीचे लक्षण परंतु डबक्याला सागर समजून बेडका प्रमाणे ड्राव  ड्राव करून उगाच विनाकारण भीती घालून पैसा गोळा करण्याचा गोरख धंदा गेल्या काही वर्षापासून नांदेड नांदेड शहरात हा भामटा करीत असल्याचे दिसून येते . पैसे उकळण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या या महामहीम बोरू बाहद्दरणे पोलीस प्रशासनाला अक्षरशः चघळून चघळून सोडले आहे . पोलीस दलात काम करत असताना छोट्या-मोठ्या त्रुटी छोट्या मोठ्या उणिवा राहत असतात परंतु या उणिवांची माहिती मिळवून त्याचा गैरफायदा घेत पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या  या बोरूबहादराने यापूर्वीही लाखोंची माया गोळ्या केल्याची चर्चा आहे. पोलीस खाते आपल्या खिशात असल्याचा बनाव करत अनेक पोलीस अधिकाऱ्यांना भेडसावण्याचा प्रयत्नही त्यांनी केल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले. एवढेच नाही तर हप्ते वसुलीसाठी दमदाटी होते अशी चर्चा आहे .ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याला काही मिळाले नाही त्या पोलीस अधिकाऱ्याची बदनामी करण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी हा भामटा ठेवतो. विशेष बाब कोणीही विचारो न विचारी पण माझे शहाणपण सर्वोत्तम आहे हे दाखवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न करणारा हा चोटा किती नीच थराला जाऊ शकतो याची असंख्य उदाहरणे अनेक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत.
 असो, असे असले तरी येत्या काही आठवड्यात या महाभागाच्या घरी एक शुभकार्य होत आहे. या शुभ कार्यासाठी आमच्याही शुभेच्छा . परंतु या शुभेच्छा देत असताना या शुभ कार्यासाठी या भामट्याने अनेकांच्या खिशाला कात्री लावली आहे .  ताट, तांब्या, वाटी, ग्लास, चमचा, कुकर, मिक्सर घेऊन देण्यासाठी याने अनेकांना गळ घातल्याची चर्चा होते. काही जणांना पाण्यासाठी सांगितले तर काही जणांना जेवणासाठी तर काहीजणांना वरातीतल्या बँड वाल्याचे पैसे देण्यासाठीही सांगितल्याची चर्चा आहे . त्यामुळे स्वतःला अराबोपती समजणाऱ्या आणि तसे भासविणाऱ्या भामट्याची औकात आता समोर आली आहे. त्यामुळे स्वतःला लेखणी सम्राट समजणाऱ्या या भामट्याची दयनीय अवस्था आणि केवलवान्या परिस्थितीची मात्र अनेक जणांकडून कीव केली जात आहे. 
माणसाने माणुसकीत राहून माणूसपण कमवावे असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते .आणि खऱ्या अर्थाने हीच सामाजिक मानसिकता प्रत्येकाने बाळगायला हवे. परंतु स्वतःपेक्षा आपण खूपच ज्ञानी , शहाणे आणि मोठे तीर मारणारे आहोत असे दाखवून देण्याचा एक ना एक दिवस भांडाफोड होतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे .दुर्दैवाने या बाबी लक्षात न ठेवता आपले शहाणपण धुरा सोबत हवेत उडवणाऱ्या या अति विराट शहाण्या माणसाच्या विविध प्रकारच्या चर्चा आता रंगात आहेत . एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे हात पसरून केविलवाण्या प्रकाराची आता चर्चा रंगली आहे. असे असले तरी होणाऱ्या शुभकार्यासाठी मात्र आमच्या मनस्वी शुभेच्छा . भविष्यात अशा शुभकार्यासाठी हा भामटा कोणापुढे हात पसरणार नाही . कोणालाही धमक्या देणार नाही किंवा कोणालाही वेठीस धरणार नाही यासाठी ईश्वर त्याला शहाणपण देओ ही आमच्याकडून शुभेच्छा.शेवटी आम्ही माणुसकी जपतो. भामटापणा नाही हे ही महत्वाचे.

Monday, November 21, 2022

छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपा नेत्यांचा निषेध आणि जाेडेमाराे आंदाेलन



नांदेड, दि. 21 ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध व जाेडेमाराे आंदाेलन, तसेच महाराष्ट्राची कन्या श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आराेपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नांदेड शहर व जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता आयटीआय कॉर्नर भागातील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरात धरणे आंदाेलन करण्यात येणार आहे. तसेच श्रद्धा वालकर हिला यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
धरणे आंदाेलनात आणि श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाला काॅंग्रेसचे सर्व आजी - माजी खासदार, आमदार, शहराध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक, पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य, सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्हा व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  उपाध्यक्ष तथा विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. माेहनअण्णा हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गाेविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यासह तालुका अध्यक्ष अॅड. निलेश पावडे, ब्लॉक अध्यक्ष किशाेर स्वामी, विनाेद कांचनगिरे, कार्याध्यक्ष किशन कल्याणकर, रहिम अहेमद खान, सुरेश हाटकर, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष साै. कविता कळसकर, शहराध्यक्ष साै. अनुजा तेहरा, युवक काँग्रेसचे तिरुपती काेंढेकर, शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पावडे, भोकर  विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष माराेती पाटील शंखतीर्थकर, एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष शशीकांत क्षीरसागर यांनी केले आहे.

Thursday, October 27, 2022

पदवीधर मतदार संघ के मतदान नोंदणी अभियान के कार्यालय का हुआ उद्घाटन..! डॉ असलम भारती ने चलाया जनजागृति अभियान, ताज नगर चौक पर हुआ नोंदणी कार्यालय का उद्घाटन


अमरावती .अमरावती पदवीधर मतदार संघ के चुनाव आने वाले कुछ माह में होने जा रहे हैं! अमरावती पदवीधर मतदार संघ की मतदान यादी 2017 की इसे रद्द कर दिया गया! अब नई मतदान यादी बनाने का अभियान शुरू किया गया! जिसमें ग्रेजुएशन मतदाताओं के नाम समाविष्ट करने के लिए दोबारा से मतदान यादी तैयार की जा रही है!
अमरावती पदवीधर मतदार संघ के मतदाता अभियान को पश्चिमी क्षेत्र( मुस्लिम बहुल) इलाके में सोशल एक्टिविस्ट डॉ असलम भारती ने जन जागृति अभियान चलाने के लिए मतदान नोंदणी कार्यालय शुरू किया! ज्यादा से ज्यादा मुस्लिम समाज के पदवीधर लोगों को जोड़ने का लक्ष्य रखते हुए डॉ असलम भारती व सलमान खान एटीएस के नेतृत्व में एक टीम पूरी तरह से काम कर रही है!इसी उद्देश्य को सामने रखते हुए ताज नगर चौक पर मतदान नोंदणी कार्यालय का उदघाटन माजी नगरसेवक इमरान अशरफी के हाथों किया गया! उद्घाटन कार्यक्रम में मौजूद हम भारत के लोग संगठन के संगठक शेख इसरार आलम, सुपर कार डील के संचालक नासिर सोलंकी, सैयद आसिफ, शेर ए हिंद न्यूज़ चैनल के सलमान खान एटीएस, सैयद आमिर इंजीनियर, शाकिर हुसैन, सैयद आदिल हुसैन आदि लोग मौजूद थे!

Saturday, September 24, 2022

रेडियोचे स्थानिक प्रसारण पुर्ववत करण्यासाठी खा. चिखलीकरांना साकडे; स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन

नांदेड,24-  नांदेड आकाशवाणीसह महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांचे पूर्वीप्रमाणे तिन्ही वेळेत स्थानिक प्रसारण सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आकाशवाणी प्रासंगिक उद्घोषक व संकलक संघटनेने दिले आहे.      
     दिनांक 1 जुलै 2022 पासून महाराष्ट्रासह गोवा आणि मध्यप्रदेशच्या एलआरएस केंद्रावरून आकाशवाणीचे  दुपारचे व संध्याकाळचे असे दोन वेळचे प्रसारण बंद केले गेले आहे.  स्थानिक कार्यक्रम बंद करून या वेळेत मुंबई व ईतर आकाशवाणीचे कार्यक्रम सहक्षेपित  केले जात आहेत. त्यामुळे स्थानिक कलावंत, कवी वक्ते, कथाकार व नाटककार सादरीकरणाला मुकले आहेत तसेच प्रासंगिक उद्घोषक व संकलन यांच्या ड्यूट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून असलेले निवेदक बेरोजगार झाले आहेत. प्रसारण बंद झाल्यामुळे श्रोते व कलावंत नाराज झाले आहेत. स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शेख हसीना, सचिव अंकुश सोनसळे, आनंदा गोडबोले, नम्रता वावळे, बालाजी गवारे व सल्लागार मिलिंद व्यवहारे यांची  उपस्थिती होती. 
चौकट 
स्थानिक आकाशवाणी केंद्राचे  प्रसारण पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली आकाशवाणी केंद्राशी पत्र व्यवहार करून पुन्हा हे प्रसारण सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. त्यांनी या निवेदनाची दखल घेऊन या संदर्भात दिल्ली कार्यालयास मेल देखील पाठवून पुन्हा स्थानिक प्रसारण सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नांदेडचा रेडियो बंद पडू देणार नाही, असे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

UAPA कायद्याने PFI सारख्या संघटनेवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्राला, केंद्र सरकार बंदी का घालत नाही? नाना पटोले

मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२२
दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात दहशतवादी कारवायांना कसलेही स्थान मिळता कामा नये, राज्यात शांतता राहिली पाहिजे हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडायला नको आहेत. अशा प्रवृत्तींना राज्यातून ताकद मिळते काय ? हे तपासले पाहिजे. हिंदू- मुस्लीम वाद निर्माण करून कोणी आपली राजकीय पोळी भाजत आहे का ? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्या लोकांवर कडक कारवाई करा. परंतु UAPA कायद्यानुसार PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती पण केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? केंद्रात आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे, या सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का? असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते पण ईडी सरकारच्या काळात राज्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदारच गोळीबार करतो, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय ?

काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सुरु झाल्यापासून देशातले वातावरण बदलले आहे. राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेची भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही दखल घ्यावी लागली म्हणून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीत जाऊन इमाम इलिसायी यांची भेट घेतली, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. कालपर्यंत राहुलजी गांधी यांच्यावर टीका करणारे बाबा रामदेव यांनीही भारत जोडो यात्रेची दखल घेत राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचे स्वागत केले. हा बदल भारत जोडो पदयात्रेमुळे होत आहे. राहुलजी गांधी हाती तिरंगा घेऊन देश जोडायचे काम करत आहेत,  सर्व धर्माला एकत्र घेऊनच देश जोडला जाऊ शकतो ही राहुलजी गांधी यांची भूमिका जर कोणाला पटत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. राहुलजी गांधी यांची भूमिका देशहिताची आहे आणि देशापेक्षा कोणी मोठा नाही.

महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबरला येत आहे. यावेळी ज्या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे त्या भागातील काँग्रेस कार्यकर्ते व लोक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतील व राहुलजी गांधी यांच्या देश जोडण्याच्या या महान कार्यात सहभागी होतील अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार

नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...