मुंबई/वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘‘शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी’’ या ट्र्स्टची स्थापना करण्यात आलेली असून, पात्र पत्रकारांना विविध आजारांसाठी मदत देण्याचे आणि जेष्ठ पत्रकारांना दरमाह मानधन देण्याचे कार्य या ट्रस्टद्वारे केल्या जाते व यास संचलित करण्यासाठी शासनाच्यावतीने शासकीय 6 आणि अशासकीय 7 व निमंत्रित अशासकीय 8 सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद असून उक्त निमंत्रित आणि सर्व अशासकीय सदस्यांना जून 2019 मध्ये बरखास्त करण्यात आल्यापासून शासकीय सदस्यांद्वारे वरील ट्रस्टचे कार्य निरंतर सुरू आहे. मागील तीन महिण्यांपासून राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्यांसह उक्त ट्रस्टसाठी निमंत्रित अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती करून घेण्यासाठी काही पत्रकार सक्रिय असल्याचे दिसून येत असले तरी जोपर्यंत पत्रकार संघटनांची चौकशी होत नाही तोपर्यंत शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी ट्रस्टवर निमंत्रित अशासकीय सदस्यांची नियुक्ती करू नये, अशी मागणी प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्राने शासनाकडे केली आहे.
प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्राने दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हंटले की, शासन निर्णय क्रमांक-माजम-2009/573/प्र.क्र. 104/34, दिनांक 1 जून 2010 शासन निर्णयानुसार स्थापना करण्यात आलेली असून, या ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रधान सचिव/सचिव, माहिती व जनसंपर्क विभाग यांची तर सदस्य सचिवपदी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक यांची आणि खजिनदारपदी माहिती व जनसंपर्क विभागातील उपसंचालक (लेखा) यांची तर सदस्य म्हणून उपसचिव/सहसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची शासकीय सदस्य (पदसिद्ध) नियुक्ती करण्यात येते. या ट्रस्टवर शासनाच्यावतीने 7 अशासकीय सदस्यांची नियुक्ती केल्या जाते व निमंत्रित शासकीय सदस्य म्हणून उपसचिव/सहसचिव गृह विभाग, उपसचिव/सहसचिव सामान्य प्रशासन विभाग (डेस्क़ 34) या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. तसेच 1) मराठी पत्रकार परिषद, 2) महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटना, 3) मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, 4) बृह्न्मुंबर्इ जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ, 5) महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद, 6) महाराष्ट्र संपादक परिषद, 7) इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आणि 8) महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ यांची निमंत्रित अशासकीय सदस्य म्हणून उक्त स्टवर नियुक्ती करण्याची उक्त शासन निर्णयात तरतूद आहे.
‘‘शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी’’ या ट्रस्टचे 7 अशासकीय सदस्य आणि 8 निमंत्रित अशासकीय सदस्यांना (विविध संघटनेचे प्रतिनिधी) शासनाने वर्ष 2019 मध्ये बरखास्त केलेले असून, शासकीय सदस्य 4 व निमंत्रित शासकीय सदस्य 2 असे एकूण 6 शासकीय सदस्यांच्यास्तरावर पत्रकारांसाठीचे असलेले उक्त ट्रस्टचे कार्य निरंतर सुरू असून, पत्रकारांद्वारा शासनास प्राप्त प्रस्ताव/विनंती अर्जावर निर्णय घेण्याचे काम प्रशासनस्तरावर सुरळीत सुरू आहेत.
No comments:
Post a Comment