Sunday, August 27, 2023

पी.एस.आय.बालाजी किरवले यांच्या संकल्पनेतून बंधुप्रेमाला पारखे झालेल्या बहिणींसाठी 'माहेर' चे रक्षाबंधन



*अंजानी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; 31 ऑगस्टला*

 बहिण भावाच्या पवित्र नात्याला रेशीमबंधाने अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून अंजानी फाऊंडेशनच्या वतीने भावाचे प्रेम न लाभलेल्या बहिणींसाठी 'माहेर' हा खास उपक्रम राबविण्यात येत आहे. अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले हे या बहिणींकडून राखी बांधून घेऊन त्यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा करणार आहेत.
      अंजानी फाऊंडेशनच्या वतीने वयोवृद्ध नागरिकांना दत्तक घेणे, रस्त्यावरील मनोरुग्ण, अपंग, विधवा निराधार, गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरविणे, तसेच दिवाळी उपक्रम, हिवाळी उपक्रम, ऊन्हाळी उपक्रम, पावसाळी उपक्रम त्याबरोबरच  शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. 
          रक्षाबंधन सणानिमित्त बहीण आपल्या लाडक्या बंधुरायाला राखी बांधून बहीण भावाच्या पवित्र नात्याला अधिक बळकट करीत असते. मात्र, अनेक बहिणींना बंधुप्रेम लाभलेले नसते. तसेच कोरोना काळात अनेक बहिणीचं माहेर हिरावून गेलं आहे अशा भाऊ नसलेल्या बहिणींना रक्षाबंधन सण आला की, आपल्याला पण भाऊ असता तर आपणही त्याला आनंदाने राखी बांधली असती, असा विचार  त्यांच्या मनात येतोच. ही बाब लक्षात घेऊन अंजानी फाऊंडेशनचे
संस्थापक बालाजी किरवले  यांच्या संकल्पनेतून मागील एक  वर्षापासून *"माहेरचे रक्षाबंधन"* उपक्रम राबविण्यात येतो आहे. या स्तुत्य उपक्रमाला आपण ही दाद द्याल अशी अपेक्षा आहे.🙏🏻🙏🏻
          आपणही भाऊ नसलेल्या बहिणीला *"माहेरचा आनंद"* देण्याचा प्रयत्न करू या. बहिणीसाठी म्हणुन आपण एक साडी, एक मिठाई बॉक्स देऊ शकता किंवा आपण स्वेच्छेने साड्या पाठवु शकता किंवा ते शक्य नसल्यास आपण आपली मदत फाऊंडेशनच्या बँक खात्यात जमा करू शकता🙏🏻🙏🏻

``` AnjaniAai Foundation
A/c No. 60383572350
Ifsc. MAHB0000033
Bank of Maharashtra

Phone pay / g pay
 8208032501 
(Jyoti mam)```
 
🌱🌿☘️🍀🍃💐🌷🪴🎍

Please Note:- आपणही रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि *आपली मदत ही ऐच्छिक आहे* 👏🏻👏🏻

No comments:

Post a Comment

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...