नांदेड ता. २६(बातमीदार) : नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाने तसेच लातुर लोकसभा मतदारसंघाचे खा. सुधाकराव श्रृंगारे यांच्या प्रयत्नातुन मारतळा परिसरातील टाकळगाव , नांदगाव, कापसी गुंफा व धनंज खुर्द येथील विकासकामांचे भुमिपुजन रविवारी ( ता.२७ ) रोजी करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर उपस्थित राहणार आहेत. तर खा. सुधाकरराव शृंगारे यांचे शुभ हस्ते विविध कास कामाचे भूमीपूजन होणार आहेत. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रनिताताई देवरे चिखलीकर , भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून टाकळगाव- बोरगाव- जोशी सांगवी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५० लक्ष रुपये, मारतळा -नांदगाव रस्त्याची सुधारणा करणे ५० लक्ष रुपये, पिपंळदरी-वाळकी-कापसी (खुर्द) येथील रस्त्याची सुधारणा करणे ६५.६० लक्ष रुपये, तर धनंज (खुर्द) येथील परमेश्वर मंदीर प्रवेशद्वाराचे भुमिपुजन १० लक्ष रुपये आदी कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपाचे लोहा तालुका अध्यक्ष आनंदराव ढाकणीकर, माजी सभापती बालाजी मारतळेकर, डॉ .सचिन पाटील उमरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील सावळे, सुभाषराव गायकवाड, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, गणेशराव उबाळे आदीसह मान्यवरांची उपस्थित राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार
नांदेड- न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...
-
नांदेड- न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...
-
नांदेड - सर्व सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देणे,भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी आणि कर्मऱ्यांच्या काळया कृत्याची पोल...
-
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्य...
No comments:
Post a Comment