यावेळी मराठवाडा नेता नांदेड आवृत्ती प्रमुख ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे,दै.एकमतचे मराठवाडा विभाग आवृत्ती संपादक चारुदत्त हे दोघे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज मंगळवार दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी संसद भवनातील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयातील दालनात खा.चिखलीकर व गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. दालनात खा.चिखलीकरासह ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे व चारुदत्त चौधरी यांचे आगमन होताच आओ पाटील साहब ओ असे म्हणून अमित शाह यांनी खा.चिखलीकर यांचे स्वागत केले. आपको जन्म दिन की बधाई म्हणून पाठीवर हात ठेवून अभिष्टचिंतन करत आशिर्वाद दिला. खा.चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दै.मराठवाडा नेता,दै.श्रमिक एकजूट,दै.एकमत अंकाचे विमोचन करुन तिन्ही दैनिक चाळले, त्यानंतर बहुत बडिया म्हणून गौरवोद्गार काढले . यावेळी शहा यांनी मतदारसंघ व जिल्हा भाजपा संघटनेची विचारपूस केली.
खा. चिखलीकर यांनी नांदेड -बिदर रेल्वे मार्गाचे लवकर भूमीपूजनाची तारीख निश्चित करण्याची मागणी केली. पंतप्रधानांशी चर्चा करून तारीख ठरवू असे ते म्हणाले. नांदेड विमानतळावरुन लवकर विमानसेवा सुरू करावी. मुंबई -नांदेड-हैद्राबाद मार्ग वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करण्याची खा.चिखलीकर यांनी मागणी केली. गृहमंत्री शाह व खा.चिखलीकर यांची ही भेट तब्बल वीस मिनिटे चार्चा झाली.केंद्रीय गृहमंत्र्यांचा निरोप घेताना अमित शाह यांनी खा.चिखलीकर यांचे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या हे विशेष!
चौकट
वाढदिवसाच्या पूर्वसन दिल आहे खासदार चिखलीकर यांना जनकल्याणाचा ध्यास
आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या कामांना प्राधान्य दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी पूर्वी खा.चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीणी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन नांदेड -बिदर रेल्वे मार्गाचे भूमीपूजनाची तारीख निश्चित करण्याची विनंती करुन मुंबई -नांदेड-हैद्राबाद मार्गे वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.यावेळी पत्रकार भाजपाचे जिल्हा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे व चौधरी,कंधारचे माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार, जि.प.चे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment